ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | दिलासादायक ! वादळी पावसाला लवकरच उघडीप मिळणार ; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Weather |राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. या पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी जीवितहानी सुद्धा झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट (weather update) समोर येत आहे. राज्यात सुरू असलेल्या वादळी पावसाला उघडीप मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

वाचा: फळबाग लागवड योजनेचा लवकरच नारळ फुटणार ! शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य ; अर्ज मागविण्यास झाली सुरुवात

आज राज्यात पाऊस पडेल

उद्यापासून राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाला उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र आज राज्यातील काही भागात मोठा पाऊस पडेल. विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अशी परिस्थिती असेल. याशिवाय कमाल तापमानात (Max. Tempreture) वाढ होण्याची देखील शक्यता आहे.

राज्यात उच्चांकी तापमानाची नोंद

काल सकाळपर्यंत नांदेड व मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. काल सोलापूर जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. याठिकाणी ३७.६ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. राज्यात बहुतेक ३१ ते ३७ अंशांच्या दरम्यान कमाल तापमान आहे.

Yellow Alert | आज राज्यात वादळी पावसाचा इशारा

राज्यात वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर याठिकाणी वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात धाराशिव, लातूर आणि विदर्भात वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली याठिकाणी सुद्धा वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

म्हणून पाऊस पडणार

तामिळनाडू किनारपट्टी आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच उत्तर कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर सुद्धा चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button