ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Onion Subsidy| अर्र ! आता कांदा अनुदान सुद्धा काढणार शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी ; अर्ज अडकले ‘तपासणी’ मध्येच …

Onion Subsidy|मागील काही महिन्यांत कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढले होते. राज्यात कांद्याचे दर ( Onion Rates) पडल्याने सर्व शेतकरी चांगलेच चिंतेत होते. यंदाच्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा कांद्याचा मुद्दा चांगलाच गाजला. दरम्यान सरकारने (State Government) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. (Onion Subcidy) या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून बाजार समित्यांकडे केलेल्या अर्जांच्या तपासणीस सुरुवात होणार आहे

कंदा अनुदान ‘तपासणी’ त अडकले

बाजार समित्यांना याबाबतच्या सूचना पणन विभागाकडुन नुकत्याच देण्यात आल्या आहेत. यामध्ये थेट पणन अनुज्ञप्तीधारक व खासगी बाजार समित्यांमध्ये झालेली आवक, तसेच खरेदी व विक्री बाबतची सर्व आकडेवारी तपासली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कांदा अनुदान तपासणीच्या चक्रव्यूहात अडकले असल्याचे म्हंटले जात आहे.

राज्य शासनाचा निर्णय

१ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली होती, त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने अनुदान जाहीर केले होते. यामध्ये फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती, थेट पणन अनुज्ञप्तीधारक आणि नाफेड केंद्राकडे कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान मिळणार होते. प्रतिक्विंटल ३५० रुपये आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रतिशेतकरी असे कांदा अनुदान दिले जाणार आहे.

फेरतपासणीच्या सूचना

यानुसार आता कांदा अनुदान प्रस्तावासाठी सर्व बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्राकडील शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील आवक नोंदवही व अन्य संबंधित दस्तऐवजातील माहिती विचारात घेतली जाणार आहे. दरम्यान तालुकास्तरीय छाननी समितीला काही प्रकरणे संशयास्पद वाटली आहेत. अशा प्रकरणांच्या फेरतपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत

१) यामध्ये कांदा विक्री कशा पद्धतीने झाली हे तपासण्यात येणार आहे.

२) रोख रक्कम दिली असल्यास संबंधित कांदा विक्रेत्याची स्वाक्षरी तपासली जाणार आहे.

३) व्यापाऱ्याचे अकाउंट बुक, आर्थिक व्यवहाराच्या नोंदी, जांगड रजिस्टर तपासले जाणार आहे.

४) आडते व व्यापारी यांच्या रकमांच्या नोंदींचा तपशील त्यांच्या बँकखात्यातून तपासला जाईल.

५) आडते किंवा व्यापाऱ्याने खरेदी केलेला कांदा विक्रीसाठी इतर राज्यात पाठविताना तयार केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

६) आडते व व्यापाऱ्याने संबंधित बाजार समिती, पणन अनुज्ञप्तीधारक, खासगी बाजार, नाफेड खरेदी केंद्राकडे कांदा खरेदीबाबत प्रतिदिनी सादर केलेली आकडेवारी आणि कांदा अनुदान प्रस्तावामध्ये संबंधित आडते, व्यापारी यांच्याकडील कांदाविक्री पट्टीवरील एकूण आकडेवारी सुद्धा तपासली जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Onion subcidy stucked in application checking

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button