ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton Price | कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! कापसाच्या दरात सुधारणा कायम; वायद्यांतही चांगली वाढ

Cotton Price | राज्यात कापूस हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यातील विदर्भ भागामध्ये कापूस पिकाला आवश्यक मृदा आणि वातावरण असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणत कापसाचे उत्पादन (Cotton Production) घेतात. या कापसाच्या दरामध्ये (Cotton Price) चढ-उतार होत असून आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया किती रुपयांनी कापसाची दरवाढ झाली आहे.

कापसाचा दरात चांगली सुधारणा
देशातील बाजारामध्ये कापूस दरात चांगली सुधारणा झाली असून वायद्यांमध्येही चांगली वाढ झाली आहे. तसेच, अनेक भागात कापसाच्या दरात चढ उतारही दिसून येत आहे. कापसाची दरवाढ झाली असली तरीही बाजारामध्ये कापसाची आवक दरवाढीनंतर कमी झाली आहे. त्यामुळे कापूस खरेदी लिलावात कापूस दरात वाढ आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी (ता. 26) कापूस वायद्यांनी 60 हजार रुपयांचा प्रति खंडाचा टप्पा गाठला होता. मात्र, बाजार बंद होताना दरामध्ये नरमाई दिसत होती. गुरुवारी (ता. 27) 59 हजार 680 रुपये प्रतिखंडाचा टप्पा दिसत होता.

कसे राहिले कापसाचे वायदे?
गुरुवारी (ता. 27) ऑक्टोंबर महिन्याचे वायदे 90 सेंट प्रति पाऊंडवर पोहोचले होते. मात्र, शेवटी बाजार 89.43 सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाला होता. कालच्या तुलनेत आज भावपातळीमध्ये वाढ झाली होती. डिसेंबर महिन्याचे वायदेही 88.10 सेंट वरून 86.80 सेंट प्रतिपाऊंडवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा उठाव वाढत असल्यामुळे ऑगस्ट महिन्यातील दरात वाढ कायम राहण्याचा अंदाज कापूस अभ्यासाकांनी व्यक्त केला आहे.

कापसाच्या दरात होणार का वाढ?
दरम्यान, कापसाला देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बाजारपेठांमध्ये कापसाचे होणारी आवक कमी झाली असल्यामुळे ही कापूस दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाची होणारी आवक कमी झाल्यास सर्वत्र कापसाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for cotton growers! Cotton rates continue to improve; Good growth in medicine too

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button