ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Bank Loan | शेतकऱ्यांना झटक्यात मिळणार कर्ज! जिल्हा बँकेच्या 300 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता, राज्य बँकेला शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे अजित पवारांचे निर्देश

Bank Loan | शेतकऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना भांडवलासाठी किंवा कोणत्याही कामासाठी कर्जाची गरज भासते. त्यामुळे हे लोक बँकांकडे धाव घेतात. आता याच कर्ज (Bank Loan) घेणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात बुधवारी 26 जुलै रोजी बैठक पार पडली. याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत बुलढाणा जिल्हा बँकेच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. चला तर मग याबाबत काय मोठा निर्णय घेण्यात आला आहे हे जाणून घेऊयात.

वाचा: Loan waiver | राज्य शासनाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांची पिक कर्जे होणार माफ; ‘इतक्या’ कोटींचा निधी वितरणास मान्यता, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का कर्जमाफी?

राज्य बँकेला दिले निर्देश

चारही बाजूंनी अडचणीत असलेल्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला तब्बल 300 कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्चस्तरीय बैठकीत बुलढाणा जिल्हा बँकेच्या प्रस्तावाला तत्वतः अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे. त्याचवेळी राज्य बँकेला शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना होणार फायदा

आता तब्बल 300 कोटींचे कर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे. ज्याचं कारण म्हणजे 300 कोटींचे कर्ज मंजूर झाल्यास कृषिप्रधान जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना कर्ज देणे सुलभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title:
Instant loan! Approval of the proposal of soft loan of 300 crores of Zilla Bank, Finance Minister Ajit Pawar’s big decision

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button