ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Salokha Yojana | शेतकऱ्यांनो फक्त 2 हजारांत मिटणार 50वर्षांच्या जमिनीचा वाद! तोही एका झटक्यात; सरकारच्या ‘या’ योजनेतून करा अर्ज

Salokha Yojana | जमिन छोटी असो किंवा मोठी, अगदी जमिनीचा तुकडा असला तरी देखील जमिनीची वाटणीही केलीच जाते. वडिलोपार्जित (Salokha Yojana) जमीनीचे करताना अनेक समस्या येतात. जमिनीचे (Land Act) विभाजन करताना वेगवेगळ्या नियमांचे पालन करावे लागते. भाव तिथे भावकी ही येतेच. आता भावकी म्हणल की, संपत्तीचा वाटा हा आलाच. यात संपत्तीच्या वाट्यामुळे (Salokha Yojana) बरेचदा वाद निर्माण होतात. याचं शेत जमिनीच्या वादामुळे अनेक शेतकरी (Agriculture) कोर्टाच्या खेट्या मारतात.

त्याचबरोबर सध्या शहरीकरण आणि औद्योगीकरणांमध्ये (Financial) प्रचंड वाढ झाली आहे. याचंमुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत. याचं जमिनींच्या (Department of Agriculture) झालेल्या तुकड्यांमुळे बरेचदा मोठे मोठे वाद निर्माण होतात. आता याच वादावर काय तोडगा काढण्यासाठी शासनाने एक नवी योजना आणली आहे.

वाचा: आता शेतकऱ्यांची फसवणुक थांबणार! ‘या’ सॉफ्टवेअरमुळे बनावट अंगठ्यांना बसणार आळा

काय आहे सलोखा योजना?
जमिनीचे ताबा आणि वहिवाटीसाठी सरकारने ही ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana) शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणली आहे. यामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी केवळ नोंदणी फी म्हणून 100 रुपये लागत आहेत. तसेच सवलतीमध्ये मुद्रांक शुल्क नाम मात्र यासाठी एक हजार रुपये लागतात. याबाबत मंगळवारी 13 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ 2 हजारांचा खर्च येतो.

काय होणार फायदे?

  • या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होणार आहे.
  • विविध न्यायालयातील प्रकरणे लवकर निकाली लागणार आहेत.
  • तसेच या योजनेमुळे भूमाफीयांचा अनावश्यक हस्तक्षेप देखील होणार नाहीये.
  • एकंदरीत योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

वाचा: होळीपूर्वीच सामान्यांना झटका! एलपीजी गॅसच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, व्यवसायिक सिलेंडरही महागले

योजनेच्या लाभाची कार्यपद्धती

  • शेतकऱ्याने तलाठ्याकडे साध्या कागदावर अर्ज करावा; अर्जासोबत गटांचे सातबारा उतारे जोडून अचूक चतु:सिमा टाकावी.
  • प्राप्त अर्जावरून तलाठी व मंडळ अधिकारी 15 दिवसांत गावातील पंचांसह त्या क्षेत्राची चौकशी करतील.
  • चतु:सिमाधारकांशी चर्चा पहिल्याची मालकी असलेली जमीन किमान 12 वर्षांपासून दुसऱ्याच्या ताब्यात कशी राहिली, याचा पंचनामा करतील.
  • जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र त्या शेतकऱ्याला देतील; एकूण चतु:सिमाधारकांपैकी अधिकार अभिलेखात नावे असलेल्या किमान दोन वेगवेगळ्या गटातील सज्ञान व्यक्तींच्या सह्या पंचनामा नोंदवहीत लागतील.
  • एखाद्या गटाला चतु:सिमाधारक एकच गट असल्यास त्या व्यक्तीची सही पंचनाम्यावर लागेल. तो पंचनामा अहवाल घेऊन उताऱ्यावरील सर्व हिस्सेदारांनी मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांकडे जावून दस्त नोंदणी करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will settle the 50-year land dispute in just 2 thousand! That too in one fell swoop; Apply through scheme of Govt

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button