ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

LPG Rate | होळीपूर्वीच सामान्यांना झटका! एलपीजी गॅसच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, व्यवसायिक सिलेंडरही महागले

LPG Rate | महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. दैनंदिन दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG Rate) वाढ झाली असून आता एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (LPG Rate) सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे सामान्यांना आता काहीसा आर्थिक (Financial) झटका बसणार आहे.

वाचापुन्हा सोयाबीन उत्पादकांवर वाईट दिवस! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी नरमले दर, जाणून घ्या कारण?

व्यवसायिक गॅसचे दर
19 किलोच्या व्यावसायिक (Business) एलपीजी सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली आहे. या वाढीमुळे दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची (Commercial Gas Rate) किंमत 2119.50 रुपये होईल. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. स्थानिक करांमुळे घरगुती एलपीजीच्या (LPG Gas Cylinder) किमती राज्यानुसार भिन्न असतात. इंधन किरकोळ विक्रेते दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमती सुधारतात.

प्रमुख शहरांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत
शहर घरगुती गॅस व्यावसायिक गॅस किंमत
दिल्ली: 1103 रु – 2119.50 रु
मुंबई: 1102.50 – 2071.50 रु
कोलकाता: 1129 -2221.50 रु
चेन्नई: 1118.50 -2268 रु

यापूर्वी बदलेले दर
यापूर्वी, ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. त्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सिलिंडरचे दर वाढवल्यानंतर रेस्टॉरंट, हॉटेल्स आदी खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. त्याचबरोबर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही बदल झाल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवरही परिणाम होणार आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील तब्बल 16 लाख शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई

गेल्या वर्षी गॅस सिलिंडरचे चार वेळा वाढलेले दर
ओएमसीने गेल्या वर्षी 6 जुलै रोजी घरगुती सिलिंडरच्या किमती वाढवल्या होत्या. सिलिंडरच्या दरात 153.5 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी चार वेळा दरात वाढ करण्यात आली होती. OMC ने मार्च 2022 मध्ये प्रथम 50 रुपयांनी, पुन्हा 50 रुपयांनी आणि मे मध्ये 3.50 रुपयांनी वाढ केली. यानंतर जुलैमध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A shock to the common people before Holi! LPG gas price hiked by Rs 350

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button