ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Rotor Subsidy| शेतकरी पुत्राचा नादचखुळा! भाव न मिळणाऱ्या पिकात रोटर फिरवण्यास अनुदानासाठी थेट राष्ट्रपतींना पाठवले पत्र

Rotor Subsidy| आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. तर निम्म्याहून अधिक नागरिकांचा उदरनिर्वाह हा केवळ शेतीवर अवलंबून आहे. तसेच शेतकऱ्यांना (Agriculture) जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. परंतु, आजच्या घडीला याच जगाच्या पोशिंद्यावर वाईट वेळ आली आहे. कारण त्याने पिकवलेल्या पिकाला खर्चापेक्षा निम्मा देखील भाव मिळत नाहीये. शेतकऱ्याची परिस्थिती आता अक्षरशः दयनीय झाली आहे. हीच परिस्थिती पाहता शेतकरी पुत्राने पुढाकार घेत थेट राष्ट्रपतींनाच (President of India) पत्र लिहिले आहे.

शेतकऱ्यांवर दयनीय परिस्थिती
शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कांदा (Onion Rate) उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती तर सांगण्यासारखीही राहिलेली नाही. 500 ते 600 किलो कांदा विकून 2 रुपयांची पट्टी हातात मिळतेय, म्हणजे ही एक आश्चर्यकारक बाब आहे. जणू काही मुद्दामूनच शेतकऱ्यांची थट्टा केली जाते अशी परिस्थिती आहे. कोबी, फ्लावर, केळी यांसारख्या अनेक पिकांवर भाव नसल्याने रोटर फिरवलं जात आहे. ही परिस्थिती आजचीच नाही तर सातत्याने पहायला मिळते. शेतमालाला कवडीचाही दर मिळत नसल्यामुळे शेतकरी थेट पिकात रोटर फिरवत आहेत.

इथून डाउनलोड करा:

थेट राष्ट्रपतींना लिहले पत्र
पिक उत्पादन घ्यायचं म्हटलं की, त्यामध्ये खूप सारा पैसा ओतावा लागतो. पण हाती मात्र फुटकी कवडीही लागत नाही. म्हणूनच भाव न मिळणाऱ्या पिकात शेतकरी रोटर फिरवत आहेत. शेतमालाला भाव नाही तर किमान पिकात रोटर फिरवण्यासाठी अनुदान तरी मिळावे. यासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडचा शेतकरी पुत्र शुभम गुलाबराव वाघ यांनीच पुढाकार घेतला आहे. थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांना या शेतकरी पुत्राने भाव न मिळणाऱ्या पिकात रोटर फिरवण्यासाठी अनुदान मिळावे यासाठी पत्र लिहिले आहे.

वाचा: होळीपूर्वीच सामान्यांना झटका! एलपीजी गॅसच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, व्यवसायिक सिलेंडरही महागले

शेतकरी पुत्राच्या पत्राची राष्ट्रपतींनी घ्यावी दखल
शुभम गुलाबराव वाघ हे एक सुशिक्षित नोकरदार तरुण असून देखील त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली. ही एक कौतुकास्पद बाब आहे. कारण आजच्या परिस्थितीत सुशिक्षित नोकरदार तरुण शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे फारसे लक्ष देत नाही. शुभम गुलाबराव वाघ हे एका शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या या धाडसाचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी दखल घ्यावी. भाव न मिळणाऱ्या पिकात रोटर फिरवण्यासाठी प्रति एकर किमान 2 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी कळकळीची विनंती या शेतकरी पुत्राने केली आहे.

वाचा: आता शेतकऱ्यांची फसवणुक थांबणार! ‘या’ सॉफ्टवेअरमुळे बनावट अंगठ्यांना बसणार आळा

शेतकरी पुत्राने पाठवलेले पत्र जसेच्या तसे,

 दिनांक: 1 मार्च 2023 

प्रति
मा. राष्ट्रपती, भारत सरकार
श्रीमती. द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती भवन
नवी दिल्ली

विषय: कांदा व इतर पिकांना भाव न मिळणाऱ्या पिकांमध्ये रोटर फिरवण्यास अनुदान मिळणेबाबत

महोदया

   आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला काही दर मिळत नसल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे 500 ते 600 किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेली केळीच्या बागेतही रोटर फिवरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. 

   एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रकमे इतकाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाहीये. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढतेय. त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाहीये. आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय. कुठलही पीक केलं तरी तिचं अवस्था निर्माण होतेय. पण त्याच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का? म्हणूनच माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

   शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटलं तरी 2000 ते 2500 रुपये लागतात. जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथं शेतमालचं विकला नाही, तर तिथं शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.

 आज शेतकऱ्यांना 2 रुपये एवढी कांद्याची पट्टी मिळतेय, पण तोच कांदा बाजारात सामन्यांना 20 रुपये किलोने विकला जातोय. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचं का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिंद्यावरच काय वेळ आली आहे. आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर 2 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे.     


                                                       आपला विश्वासू
                                                                शुभम गुलाबराव वाघ 

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A letter sent directly to the President for a grant to rotate rotors in non-price crops

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button