ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop loan| ‘या’ जिल्ह्यासाठी जाहीर झाला पीककर्ज लक्ष्यांक, शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी त्वरित अर्ज करावे, बँकेचे आवाहन

Crop loan| शेतकरी नवीन हंगामात मशागतीसाठी पीककर्जावर अवलंबून असतात. हे पीककर्ज विविध बँकांच्या माध्यमातून देण्यात येतं. हे पीक कर्जवाटप करण्यासाठी बँकांना लक्ष्यांक म्हणजे टार्गेट देण्यात येतं.
यामध्ये सरकारी बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका इत्यादींचा समावेश असतो. यानुसार बँका कर्जवाटप करतात. 2022-23 या वर्षासाठी नाशिक जिल्ह्याला पीक कर्जवाटप लक्ष्यांक 4 हजार 16 कोटी रुपये होता. यापैकी 31 मार्च 2023 अखेर 3 हजार 426 कोटींच्या पीककर्जाचं वाटप जिल्ह्यात झालं आहे.

वाचाशिंदे फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय, ‘हे’ साखर कारखाने ठरणार कर्जासाठी अपात्र

गतसाली सर्वाधिक लक्ष्यांक

गेल्या वर्षी पीककर्ज वाटपासाठी सर्वाधिक लक्ष्यांक सरकारी बँकांना देण्यात आला होता. मात्र त्यांच्या कडून तो पूर्ण झालेला नाही. यात चालूवर्षी वाढ करण्यात आली आहे. त्या खालोखाल खासगी बँकांना हा लक्ष्यांक देण्यात आला. त्यांनी 113 टक्के वितरण पूर्ण केले आहे.
तर ग्रामीण बँकांचा आकडा फक्त 11 कोटी असला तरीही त्यांनी तो पूर्ण करून सर्वाधिक टक्केवारी 155 इतकी ठेवली आहे. जिल्हा बँकेने सर्वांत कमी वितरण केले आहे. तर चालूवर्षी लक्ष्यांक कमी करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पीककर्ज वितरणाची स्थिती

सरकारी बँकांना 2709.6 कोटी इतका लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी 2198.7 कोटी रुपये साध्य झाला आहे. ही टक्केवारी आहे 81.15 टक्के इतकी. 2023-24 साठी सरकारी बँकांचा लक्ष्यांक आहे 2764.8 कोटी रुपये. खासगी बँकांना 657.7 कोटी इतका लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी 746.2 कोटी रुपये साध्य झाला आहे. ही टक्केवारी आहे 113.45 टक्के. 2023-24 साठी खाजगी बँकांचा लक्ष्यांक आहे 802.5 कोटी रुपये. जिल्हा मध्यवर्ती बँकांना 637.3 कोटी इतका लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी 464 कोटी रुपये साध्य झाला आहे. ही टक्केवारी आहे 72.80 टक्के. 2023-24 साठी जिल्हा मध्यवर्ती बँकांचा लक्ष्यांक आहे 615 कोटी रुपये इतका.

वाचाआता शेतीला मिळणार दिवसा वीज, राज्य मंत्रीमंडळाचा ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

काय म्हणाले बँकेचे व्यवस्थापक
राजेश पाटील हे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी सांगितलं आहे की खरीप हंगामासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी बँकेकडे एप्रिल महिन्यातच त्वरित पीककर्ज मागणी अर्ज करावा, जेणेकरून आपल्याला खरीपपूर्व मशागतीसाठी आणि पेरणीसाठी बँकाकडून वेळेत कर्जपुरवठा करणे शक्य होईल.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button