ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

Apple Farming | नादचखुळा! युट्यूबवर व्हिडिओ पाहून थेट महाराष्ट्रातील ‘या’ दुष्काळी भागात केली सफरचंदाची लागवड

अगदी छोट्याशा लहान मुलाला जरी विचारलं की, सफरचंद कुठे पिकते? तर तो देखील काश्मीर असच उत्तर देईल. कारण सफरचंद हे केवळ काश्मीरमध्येच (Kashmir) पिकतं. हे सर्वांनाच माहित आहे.

Apple Farming | परंतु आता हा सफरचंद लागवडीचा इतिहास एका युवा शेतकऱ्याने मोडीत काढला आहे. तर तंत्रज्ञानाच्या (Agricultural Technology) मदतीने शेतकरी काय करू शकतात हा देखील चांगलाच उपक्रम इतर शेतकऱ्यांना त्यांनी दिला आहे. सफरचंदाचे पीक (Apple Farming) हे केवळ थंड हवेच्या ठिकाणीच वाढू शकतं. मात्र एका शेतकऱ्याने दुष्काळी भागात याचे उत्तम प्रकारे पीक घेऊन उत्पादन मिळवले आहे. ज्याची माहिती (Agriculture) आपण आज घेणार आहोत.

दुष्काळी भागात घेतलं सफरचंदाचे पीक
अलीकडे तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी शेतीमध्ये पिकांची लागवड करताना दिसून येत आहे. थंड ठिकाणी येणाऱ्या सफरचंदाच्या (Apple Farming in Maharashtra) बागा देखील आता महाराष्ट्रात चांगल्याच खुलू लागल्या आहेत. आता याबाबत दुष्काळी भाग असणारा बीड जिल्हा देखील मागे राहिला नाही. तर बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील शेतकरी सुरेश सीताराम सजगणे व बाळासाहेब सीताराम सजगणे दोन भावांनी दुष्काळी भागात सफरचंदाची लागवड केली आहे.

वाचा: Rose Farming | काय सांगता? गुलाबापासून बनतात ‘ही’ उत्पादने, शेतकरी थेट 10 वर्ष कमवू शकतात नफा

मोबाईलमुळे दुष्काळी भागात घेतलं सफरचंदाचं पिक
आज मोबाईल काळाची गरज बनला आहे. छोट्या छोटी आणि मोठ्यात मोठी गोष्ट मोबाईलद्वारे लोकांना माहीत होत आहे. या दोन भावांमध्ये 40 एकर जमीन आहे. ते शेतीत (agriculture) केवळ पारंपारिक पिके घ्यायचे. मात्र त्यांनी मोबाईलद्वारे युट्युब व्हिडिओ पाहून चक्क दुष्काळी भागात सफरचंदाची बाग खुलवण्याचा अट्टाहास केला.

कशी केली सफरचंदाची लागवड?
सुरेश सगणे यांनी सफरचंदाची लागवड करण्यापूर्वी विविध माध्यमातून तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी संपर्क साधला. त्यांच्या शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले आहे. तरी देखील ते विविध व्हिडिओपाहून शेतीमध्ये प्रयोग करत असतात. सुरेश सहगणे यांनी मोठं धाडस दाखवत ऑनलाइन 600 सफरचंदाची रोपे मागवली. त्यांनी कोरोना काळात म्हणजेच डिसेंबर 2020 च्या दरम्यान आपल्या दीड एकर शेतीमध्ये यातील 400 रोपांची लागवड केली. त्यानंतर त्यांनी ड्रीप सिंचनाद्वारे या सफरचंदाच्या बागेला तीन ते चार दिवसांच्या अंतरावर पाणी दिले.

वाचा: Wheat | तब्बल 8 हजार रुपये क्विंटलने विकला जातोय ‘हा’ गहू, शेतकऱ्यांनो मालामाल होण्यासाठी हा गहू…

शेतकऱ्याने दिली बागेची माहिती
सफरचंदाचा एक हंगाम असतो. तर जानेवारी महिन्यामध्ये सफरचंदाच्या झाडाला फुले येतात. दीड महिन्यानंतर त्या फुलांचा रूपांतर फळांमध्ये व्हायला सुरुवात होते. तर जून जुलै दरम्यान फळ पूर्ण होऊन बाजारात विक्रीस तयार होत. अशी माहिती सुरेश सहगणे यांनी दिली आहे. दुष्काळी भागात शेती करणं किती अवघड आहे हे सर्वांनाच माहित आहे. परंतु दुष्काळी भागात थेट सफरचंदाची लागवड करून या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणा ठेवली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button