ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Bank | अर्रर्र! शेतकऱ्यांचे पुन्हा अडकले पैसे! ‘या’ बँकेतून काढता येणार केवळ 15 हजार, वाचा काय आहे कारण

रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या काही दिवसांत काही बँकांवर दंड ठोठावल्यानंतर आता एका बँकेने पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

Bank | आरबीआयच्या वतीने मुंबईतील रायगड सहकारी बँक लिमिटेडवर (Raigad Cooperative Bank) अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. बँकेची (Bank) ढासळलेली आर्थिक (Financial) स्थिती पाहता मध्यवर्ती बँकेने (Central Bank) हे पाऊल उचलले आहे.

रायगड को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी 15,000 रुपये काढण्याची मर्यादा
सेंट्रल बँकेने 15,000 रुपये काढण्याची मर्यादा लागू केली आहे. या निर्बंधांनंतर सहकारी बँक रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज (Loan) देऊ शकणार नाही. कोणतीही गुंतवणूक (investment) करू शकणार नाही आणि नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही.

वाचा: Eknath Shinde | नादचखुळा! शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी उडवला थेट डबल बार, आता प्रोत्साहन अनुदानासह अतिवृष्टीग्रस्तांनाही…

ही बंदी सहा महिन्यांसाठी कायम राहणार
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत (savings account) आणि चालू खात्यातून (current account) 15,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम (amount) काढू शकणार नाहीत. बँकेवरील हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू असतील. रायगड सहकारी बँकेला दिलेल्या सूचनांचा अर्थ बँकिंग परवाना रद्द करण्याचा नाही असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

वाचा: Apple Farming | नादचखुळा! युट्यूबवर व्हिडिओ पाहून थेट महाराष्ट्रातील ‘या’ दुष्काळी भागात केली सफरचंदाची लागवड

दोन बड्या बँकांवर दंड
ठोठावला गेला यापूर्वी आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल दोन बड्या बँकांवर दंड ठोठावला होता. आरबीआयने दिलेल्या माहितीत कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेला नियामक अनुपालनाचे पालन न केल्याबद्दल प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button