ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Farmers Success| नोकरी गेली तर गेली, पठ्ठ्यानं ‘या’ शेतीतून कमावले 30 गुंठ्यांत 10 लाख रुपये, कसे ते वाचा सविस्तर

Farmers success| आपण अनेक शेतकऱ्यांच्या यशाच्या कथा ऐकत असतो. त्यापैकीच ही एक आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील हे शेतकरी. अभिजित गोपाळ लवांडे असं यांचं नाव. यांनी 30 गुंठ्यांवरील अंजिराच्या (Fig) शेतीतून 14 टन विक्रमी उत्पादन घेतलं आहे. यात त्यांनी 10 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यांना कृषी विभागाकडून शेत तळ्याचा लाभ तसेच कृषि विषयक प्रशिक्षण मिळाले आहे. याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे, असं अभिजित सांगतात.

वाचाशिंदे फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय, ‘हे’ साखर कारखाने ठरणार कर्जासाठी अपात्र

अभिजित यांची पार्श्वभूमी

दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीत अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अभिजितही यातून सुटले नाहीत. त्यांचीही कोरोना महामारीच्या काळात नोकरी गेली. पण ते निराश झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी आपले पूर्ण लक्ष शेतीकडे वळवले. त्यांची वडिलोपार्जित 9 एकर शेती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी शेती बारमाही बागायती केली. त्यासाठी कृषी विभागातून शेततळ्यासाठी 3 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यामध्ये वडील व काकांचे खूप मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळावे यासाठी त्यांनी कृषि विभागात प्रस्ताव सादर केला आहे. कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून कृषी विस्तार योजनांच्या प्रशिक्षण शिबिरातून त्यांनी प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षणाचा उपयोग करून त्यांनी शेतीमध्ये अनेक सुधारणा घडून आल्या.

अशी केली शेती

अभिजित यांनी आपल्या शेतात अंजीर चार एकर अंजीर, तीन एकर सीताफळ आणि पाऊण एकर जांभूळ अशी फळझाड लागवड केली. चार एकरात पुना पुरंदर या वाणाच्या 600 अंजीर झाडाची लागवड अभिजित यांनी केली. खट्टा आणि मिठा अशा दोन्ही बहारात उत्पादन घेतले. खट्टा बहारमध्ये जून महिन्यात छाटणी करुन साधारण साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. अभिजित यांना प्रत्येक झाडापासून 100 ते 120 किलो तर एकरी 13 ते 14 टन उत्पादन मिळाले. या बहारात प्रती किलोला दर 80 ते 100 रुपये इतका दर मिळाला. मिठा बहारमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात छाटणी  व त्यानंतर साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. या बहाराच्या फळांस त्यांना 85 रुपये प्रती किलो रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचाआता शेतीला मिळणार दिवसा वीज, राज्य मंत्रीमंडळाचा ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

जर्मनीला केली निर्यात

अभिजित यांनी अंजीर फळाची बाजारपेठेच्या मागणी प्रमाणे पॅकिंग केले. पॅकिंग केलेल्या मालाची विक्री सासवड, पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैद्राबाद, गुजरात व दिल्ली येथे केली. गतसाली तर जर्मनी देशातून अंजिराला मागणी आल्याने त्यांनी प्रायोगिक स्वरुपात वर 100 किलो मालाची निर्यात केली. यानंतर अभिजित शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. राज्यासह हैद्राबाद, गुजरात, राजस्थान येथील शेतकरी अभिजित यांची अंजीर बाग पाहवयास येतात व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. त्यांच्या अंजीर बागेत 7 ते 8 लोकांना रोजगार भेटला आहे. अभिजित यांनी अंजिराचे नवीन सुधारित वाणही तयार केले आहेत.
अशाप्रकारे शेतकरी नवनवीन प्रयोग करताना आणि त्यात यशस्वी होताना दिसतात.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button