ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | ब्रेकिंग! ‘या’ योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी 104 कोटींच्या निधीस मान्यता, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

Yojana | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपारिक पिकांसोबतच बागायती पिकांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. विविध राज्यांनी शेतकऱ्यांना (Agriculture) विशिष्ट बागायती पिकांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले आर्थिक (Financial) उत्पन्न मिळावे यासाठी फळबाग पिकांच्या लागवडीसाठी विविध योजना (Department of Agriculture) राबविण्यात येत आहेत. राज्यात लाखाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. त्यापैकीच शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान (Orchard Plantation Subsidy) देणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना’ होय.

2022-23 मध्ये योजना राबविण्यास मंजुरी
कोरोनाच्या काळात भाऊसाहेब फुंडकर फळबाग ही योजना (Yojana) राबवली गेली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये. ही योजना बंद पडली की काय? असा संभ्रम निर्माण झाला होता. त्याचबरोबर 2022- 23 मध्ये देखील ही योजना जाईल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आले आहे. बरेच शेतकरी (Agricultural information ) या योजनेसाठी पात्र होण्याची अपेक्षा होती. आता त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणारं आहे.

वाचाब्रेकींग! शेतकऱ्यांवर आता वीज दरवाढीचं मोठं संकट; युनिटामागं होणारं ‘इतक्या’ रुपयांची वाढ

पुढील प्रक्रिया सुरू
राज्य सरकारच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरता 104 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान (Subsidy) मंजूरी देण्यात आली होती. शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग होण्यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. ज्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. आता याची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.

104 कोटींचा निधी मंजूर
4 ऑक्टोबर 2022 रोजी या योजनेला राबवण्यासाठी एक शासन निर्णय घेऊन 2022-23 मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी तब्बल 104 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा: नवीन वर्षापूर्वीच शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज; ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 13वा हप्ता

कोणत्या पिकांसाठी मिळणार अनुदान?
शेतकऱ्यांना आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू इत्यादी फळझाडांसाठी या योजनेंतर्गत लागवडीसाठी लाभ मिळेल.

कोणत्या विभागाला किती निधी?
• कोकण: 9 कोटी 34 लाख
• नाशिक: 12 कोटी
• पुणे: 18 कोटी 41 लाख
• कोल्हापूर: 12 कोटी 10 लाख
• औरंगाबाद: 12 कोटी 3 लाख
• लातूर: 15 कोटी 11 लाख
• अमरावती: 14 कोटी 60 लाख

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Fund of 104 crores approved for plantation of fruit orchards under this scheme, know how much fund to which district?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button