ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

ब्रेकींग! 1 जानेवारी नाहीतर ‘या’ तारखेला शेतकऱ्यांना मिळणार 13वा हप्ता; जाणून घ्या कधी?

PM Kisan | पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारकडून 10 कोटी शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात 12 व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली. मागील हप्त्याचे दोन महिने पूर्ण होऊन डिसेंबरच्या सुरुवातीस कोट्यवधी शेतकरी 13वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. या योजनेत केंद्रातील मोदी सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना (Department of Agriculture) दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

डीबीटीद्वारे पैसे पाठवले जातील
प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना ( Farming) सहा हजार रुपये दिले जातात. पीएम किसान (PM Kisan Yojana) निधीचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांना 1 जानेवारीला नाही तर, त्यापूर्वीच 15 ते 20 डिसेंबर दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांना (Agri News) देण्याचा सरकारचा विचार आहे, असा दावा सूत्रांनी केला आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीही थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गडकरींची मोठी घोषणा! केवळ 10 रुपयांत शक्य होणार कारने प्रवास अन् वाहनाची किंमत असेल फक्त…

पीएम किसानसाठी नोंदणी कशी करावी?
जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल, तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन प्रकारे नोंदणी करू शकता. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील पटवारी (लेखपाल) किंवा पीएम किसान योजनेसाठी निवडलेल्या नोडल ऑफिसरकडे जावे लागेल. येथे संबंधित फॉर्म भरून तुमची कागदपत्रे सबमिट करा. याशिवाय तुम्ही जवळच्या लोकसेवा केंद्राशी (CSC) संपर्क साधू शकता. या दरम्यान तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा.

वाचा: ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

13व्या हप्त्यासाठी रेशनकार्ड जमा करणे आवश्यक
पीएम किसान निधीच्या (PM Kisan Nidhi) पुढील हप्त्यासाठी शेतकऱ्यांचे रेशनकार्ड जमा करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला शिधापत्रिकेची हार्ड कॉपी जमा करावी लागणार नाही. फक्त शिधापत्रिकेची PDF अपलोड करावी लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. शिधापत्रिकेची PDF फाईल तयार केल्यानंतर ती अपलोड करून सबमिट करा. जर तुम्ही शिधापत्रिकेची प्रत जमा केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Farmers will get 13th installment on January 1 or date; Know when?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button