ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Smart Meter | आनंदाची बातमी ! एप्रिलपासून स्मार्ट मीटर; वाढत्या वीजबिलांवर कायमची सुटका!

Smart Meter | Good news! Smart meters from April; Permanent relief from rising electricity bills!

Smart Meter | वाढत्या वीजबिलांमुळे त्रस्त वीजब ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेच्या (Smart Meter) खर्चावर पूर्ण नियंत्रण मिळेल आणि वाढत्या वीजबिलांवर कायमची सुटका मिळेल.

महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, ग्राहकांना विजेच्या खर्चावर पूर्ण नियंत्रण देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहक मोबाइल फोनप्रमाणेच वीज वापरण्यासाठी पैसे भरू शकतील आणि विजेसाठी किती खर्च करायचा हे निश्चित करू शकतील.

वाचा | Smart Farming | शेतीला मिळणार क्रांतिकारी बदल, पाणी, खत आणि कीटकनाशकांचा अतिवापर रोखण्यासाठी सरकारची महत्वाकांक्षी योजना

स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये:

  • वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर (Smart Meter) मोफत दिले जातील.
  • ग्राहकांना विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल.
  • वीज वापरावर किती खर्च करायचा आणि किती वीज वापरायची हे नियोजन ग्राहक स्वतः करू शकतील.
  • वीजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल.
  • रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होईल.
  • रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज किती वीज वापरली गेली, किती रक्कम शिल्लक आहे आणि रिचार्ज संपत आल्याची माहिती ग्राहकांना मोबाईलद्वारे मिळत राहील.
  • रिचार्जची रक्कम सायंकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत संपल्यासही वीजपुरवठा सुरू राहील. मात्र, ग्राहकांना दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत रिचार्ज करणे आवश्यक आहे. रिचार्ज संपल्यानंतर वापरलेल्या वीजेची रक्कम कपात होईल.

स्मार्ट मीटरच्या (Smart Meter)अंमलबजावणीमुळे अमरावतीतील वीज ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. वीजबिलांवर नियंत्रण, विजेचा अनावश्यक वापर टाळणे आणि आर्थिक बचत यासारख्या गोष्टी शक्य होतील. एप्रिलपासून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू होत असल्याने, वीज ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title | Smart Meter | Good news! Smart meters from April; Permanent relief from rising electricity bills!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button