ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Scam | सावधान ! कुरिअर आणि नोकरीच्या नावाखाली फसवणूक सुरू; अशा परिस्थितीला असे द्या तोंड

Scam |जिकडे तिकडे सध्या ऑनलाईन स्वरूपातून फसवणुकीचा धंदा सऱ्हास सुरू आहे. याच ऑनलाईन स्वरूपात होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी बँका, मीडिया, सरकार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करतात. यामुळे ऑनलाईन ठग हे युझर्स फसवणूक करण्याचा कोणता ना कोणता मार्ग शोधून काढतात. या फसवणुकीपासून कसे दूर राहावे ही माहिती या लेखात दिली आहे.

अनेकांना कुरिअर कंपनीच्या माध्यमातून मेल येतो. तुमच्या नावावर पार्सल असल्याचे सांगितले जाते. यावर २४ तासाच्या आत पार्सल मिळवण्याची प्रक्रिया करा, अन्यथा दंड बसू शकतो. तसेच मेलद्वारे डॉक्युमेंट्स पाठवा असे सांगितले जाऊ शकते. तसेच एखादा बनावट अधिकारी तुमच्याशी फोनवर बोलेल. तुमच्याकडून तुमचे ओळखपत्र आणि इतर माहिती काढून घेतील. जर तुम्ही ही प्रक्रिया फॉलो न केल्यास तुम्हाला अटक करण्यात येईल. अशी भीती दाखवली जाईल. तेव्हा यापासून ही परिस्थिती कशी हाताळावी ही माहिती पुढीलप्रमाणे नमूद केली आहे.

अशी परिस्थिती हाताळा

वरीलपैकी दोन पर्याया मधून जर मेलद्वारे जर कुणी बोललं तर, आधी मेल आयडी वेरिफाय करा. त्यानंतर त्या मेल आयडीच्या नावाचे स्पेलिंग मिस्टक्स पहा. तसेच मोबाईलद्वारे कॉल आल्यास कॉलरला सांगा की तुम्ही थेट कुरिअर कंपनीशी चौकशी करा.

अशा पद्धतीने होऊ शकते फसवणूक

फसवणूक करणारा कॉलर बँकेचा प्रतिनिधी बनून तुमच्याशी बोलू शकतो. जो तुम्हाला तुमच्या जमिनीवर एटीएम बसवण्याची ऑफर देईल. कॉलर तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रत्येक एटीएम व्यवहारावर ५-१५ रुपये कमवू शकता. ते तुम्हाला आधार आणि पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे जमा करा म्हणून सांगतील. यावर सेक्युरीटी अमाऊंट म्हणून ५ लाखांपर्यंत मागणी करू शकतात.

असा करा बचाव

एखाद्या ठिकाणी अशा फ्रँचायझीसाठी अर्ज पाठवल्यावरच एटीएम बसवले जातात. तुमच्याकडे ५०-१०० चौरस फूट जागा आहे, जी दुसऱ्या एटीएमपासून किमान १०० मीटर अंतरावर आहे आणि १ किलोवॅट वीज पुरवठा आहे याची तपासणी केल्यानंतरच बँक एटीएम बसवण्याची परवानगी देईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button