ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
PM KISANकृषी बातम्या

PM Kisan | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’मुळे तुमच्या खात्यात पीएम किसानची रक्कम येतं नाहीत; जाणून घ्या कारण

PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक (Financial) मदत करते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दर 4 महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते. 12 हप्ते शेतकऱ्यांना (Department of Agriculture) वर्ग करण्यात आले आहेत. 13 वा हप्ता आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित केला जाणार आहे.

तुम्ही पात्र नसल्यास तुमचे नाव तपासा
या योजनेची नोंदणी करताना तुम्ही चुकीची माहिती भरली असली तरी या योजनेची रक्कम तुमच्या खात्यात (Type of Agriculture) पोहोचणार नाही. तुम्हाला पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थी यादीत तुमचे नाव पहायचे असेल, तर अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचे नाव लाभार्थी यादीत पाहू शकता. येथे वेबसाइटला भेट देऊन, आधार क्रमांक, बँक (Bank) खाते क्रमांक निश्चितपणे तपासा.

वाचा: दुष्काळात तेरावा महिना! रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेला लावला टाळा, आता शेतकऱ्यांच्या पैशाचं काय होणार?

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
आता होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ विभागात क्लिक करा.
फार्मर्स कॉर्नर विभागात ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा.
आता पीएम किसान खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक यांपैकी कोणताही एक पर्याय निवडा.
तपशील भरल्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मिनी ट्रॅक्टरसाठी मिळतंय 90 टक्के अनुदान; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

येथे करा संपर्क
पीएम किसान योजनेबाबत काही समस्या असल्यास, तुम्ही [email protected] या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. येथे देखील या योजनेशी संबंधित प्रत्येक समस्या सोडविली जाईल.

ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी होत नाही ते पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहतील. तुम्हाला तुमच्या खात्यात 13 वा हप्ता हवा असल्यास, पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. असे न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेची रक्कम पाठवली जाणार नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Attention farmers! Is the amount of PM Kisan not coming in your account? Find out why

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button