ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळाची बैठक पडली पार; घेण्यात आले महत्त्वपूर्ण शासन निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार ‘हा’ हक्क

Eknath Shinde | आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना (Agriculture) एक मोठा हक्क मिळणार आहे. चला तर मग आजच्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घेऊयात.

• हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द
• कोविडमुळे झालेल्या विपरित परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मुल्याधारित मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय
• “जेएसपीएम विद्यापीठ, पुणे” या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता
• आता पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस- आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेणार. भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा.

• एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या. ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता.
• आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार
• नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येईल

• महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार ६२९ कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास मंजुरी. भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार
• राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र. कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केल्याप्रमाणे होणार. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करणार.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button