ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Agricultural Advisory | राज्यात पुढचे चार दिवस वातावरणात होणार ‘असे’ बदल; त्वरित जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र अंदाजानुसार, पुढील चार दिवस दिनांक 17 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ व हवामान (Weather) कोरडे राहण्याची अधिक शक्यता आहे. कमाल तापमान 28.8 ते 29.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12.0 ते 13.1 अंश सेल्सिअस राहण्याची आशिक शक्यता आहे. सकाळची (Financial) सापेक्ष आद्रता 49 ते 61 टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता 48 ते 57 टक्के राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती (Agriculture) पिकाची कशी काळजी घ्यावी याची माहिती घेऊयात.

  • कपाशीमधील दहिया रोग व्यवस्थापनासाठी अझॉक्सिस्ट्रो बिन 18.2 % डब्ल्यू/डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल 11.4 %
  • डब्ल्यू/डब्ल्यू एससी 10 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथाइल 44.3 एसस 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • वाणानुसार (Farming) वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा.
    परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

• रब्बी हंगामातील घ्यावयाच्या पिकाच्या बियाण्यास पेरणी पूर्वी बीज प्रक्रिया करावी.
• पुढील पाच दिवस हवामान (Department of Agriculture) कोरडे राहण्याची शक्यता असल्याने परिपक्व झालेल्या पिकाची काढणी, फळबागा, भाजीपाला पिके आणि कपाशी व तूर तसेच इतर पिकामध्ये फवारणी, आंतरमशागतीची कामे आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे सुरु ठेवावी.
• वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: There will be ‘such’ changes in the atmosphere in the state for the next four days; Get instant weather based agriculture advice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button