ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

आता शेतकऱ्यांना विहिरींसाठी मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; जाचक अटही रद्द

काय आहे मोठा निर्णय –

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा)Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee scheme ( MNREGA ) अंतर्गत सिंचन विहिरींबाबत ( We’ll Irrigation method) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन विहिरींतील अंतराची अट शिथिल केली आहे. दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे, ३ लाखांवरून चार लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे. आता एका गावात कितीही विहिरी घेता येणार आहेत.

शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी मोहीम –

ग्रामीण भागात रोजगार मिळण्यासाठी व सिंचन क्षेत्रातही वाढ व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात. भूजल सर्वेक्षणानुसार राज्यात अजून सुमारे ३ लाख ८७ हजार ५०० विहिरी खोदणे शक्य आहे.शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचं गारूड राज्य सरकारने नव्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुदान देताना नव्याने बरेच बदल केले आहेत. सिंचन विहिरींसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया ( Standard Operating Procedure) राबविण्यात येणार आहे. विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे. एकापेक्षा अधिक लाभधारकही विहिरीचा लाभ घेऊ शकतात.

वाचा: मक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

या गोष्टींची दक्षता घ्यावी –

विहिरीचा लाभ लाभार्थी देऊ शकतात पण याच सोबत काही अटी मान्य करणे गरजेचे आहे.सार्वजनिक जलस्रोताच्या ५०० मीटर परिसरात मात्र नवीन विहीर घेता येणार नाही. मात्र पूर्वी दोन विहिरीत किमान दिडशे मीटरच्या अंतराच्या अट रद्द केली आहे. ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीची मंजुरी आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाचा लेबर बजेटमध्ये समावेश करावा लागणार आहे. विहीर मंजूर झाल्यानंतर लाभधारकाला तीन वर्षांत तिचे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.

वाचा: बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

या योजनेतर्फे शेततळ्यांचा लाभ –

या योजनेतर्फे वैयक्तिक शेततळे लाभार्थ्यांना दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात व नाल्यांच्या संगमाजवळ जेथे मातीचा किमान ३० सेंटीमीटरचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मऊ आढळतो, तसेच नदी व नाक्याजवळील उथळ गाळाच्या प्रदेशात, जमिनीच्या सखल भागात जेथे किमान ३० सेंटीमीटरपर्यंत मातीचा थर ५ मीटरपर्यंत खाली मुरूम आढळतो त्याठिकाणी विहीर खोदता येईल‌, तसेच नदी व नाल्याच्या गोलाकार वळणाच्या आतील बाजूस, अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेतही विहीर खोदता येईल, असे नव्या आदेशात नमुद केले आहे. यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे.

या योजनेचे लाभार्थी –

बरेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी, स्त्री कर्ता असलेली कुटुंबे, शारीरिक विकलांग व्यक्ती कर्ता असणारी कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती, सिमान्त शेतकरी, अल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button