ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisan | पीएम किसानचा 12वा हप्ता ‘या’ दिवशी होणारं खात्यात जमा; त्यापूर्वीच जाणून घ्या लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर कोणाला मिळणार लाभ?

PM Kisan | शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मोदी सरकारने किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात हे 6 हजार रुपये सरकार शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरूपात प्रदान जातात. तुम्हीही लहान आणि मध्यम शेतकर्‍यांच्या (Agriculture) श्रेणीत येत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. सरकारने 2019 मध्ये याची सुरुवात केली. यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान (PM Kisan Yojana) निधीच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. मात्र एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तरी या योजनेचा (Financial) लाभ घेता येतो. कसे ते येथे जाणून घ्या.

वाचा: पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार तब्बल 15 लाख; जाणून त्वरित करा अर्ज

लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर कोणाला मिळतो लाभ?
गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत सरकारकडून 3 हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. परंतु लाभार्थी मरण पावल्यास त्या शेतकऱ्याच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, त्या शेतकऱ्याच्या वारसाला पोर्टलवर स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागेल. याशिवाय हे वारस शासनाच्या अटींची पूर्तता करतात की नाही हेही पाहिले जाईल. शेतकऱ्याच्या वारसांनी या योजनेअंतर्गत केलेल्या नियमांची पूर्तता केल्यास त्यांना या योजनेचा लाभ निश्चितच मिळेल.

17 ऑक्टोबर रोजी जमा होणार 12 वा हप्ता
सध्या शेतकरी पीएम किसान सन्मान (PM Kisan Yojana) निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 17 ऑक्टोबरपर्यंत पीएम किसानचा (PM Kisan) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी केवायसीची प्रक्रिया आणि शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) डेटाबेसची पडताळणी यामुळे पीएम किसानची मदत रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. हा काळ सण आणि पिकांच्या काढणीचा काळ आहे, त्यामुळे शेती आणि वैयक्तिक खर्च लक्षणीय वाढतात. अशा परिस्थितीत पीएम किसानच्या 12 व्या मदत रकमेतून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल.

वाचा: महाराष्ट्रातील ‘या’ भागांत होणार पावसाची जबरदस्त बॅटिंग! नागरिकांसह शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन, पिकाचं होऊ शकत मोठं नुकसान

नोंदणी कशी करावी.
https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
• त्यानंतर फार्मर्स कॉर्नरवर जा.
• नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा.
• येथे आधार क्रमांक प्रविष्ट करा, नंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
• आता तुमचे राज्य निवडा आणि प्रक्रियेसह पुढे जा.
• त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती द्या.
• यासोबतच तुम्हाला बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
• त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

अशाप्रकारे तपासा यादीतील नाव
• पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
• फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल
• या विभागात लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.
• त्यानंतर राज्याचे नाव, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
• आता Get Report वर क्लिक करा, आता लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल.
• यामध्ये तुम्ही तुमचे नाव सहज तपासू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The 12th installment of PM Kisan will be credited to the account on day; Before that know who will get the benefit after the death of the beneficiary?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button