ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisan | पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार तब्बल 15 लाख; जाणून त्वरित करा अर्ज

PM Kisan | भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदत करते. शेतकऱ्यांना शेतीतील (Agriculture) पिकातून भरघोस उत्पादन निघावे यासाठी सरकार नेहमीच धडपड करत असते. त्याचबरोबर पीएम किसान निधी योजना (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकार दोन हजार रुपये प्रदान करते. याला लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या लाभार्थ्यांना आता 15 लाख रुपये मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया शेतकऱ्यांना हे 15 लाख रुपये कसे मिळतील.

शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये
मोदी आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांचे कर्ज (Loan) फेडावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आता सरकार शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय (Agribusiness) सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Finance) दिलासा मिळणारं आहे. तसेच शेतकरी आपला स्वतः चा व्यवसाय करू शकणार आहेत.

वाचा: शेतकऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात! दिवाळीपूर्वी मिळणार पीएम किसानचा 12वा हप्ता, ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार 4 हजार

कसे मिळणार शेतकऱ्यांना 15 लाख?
शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सरकारने ‘पीएम किसान एफपीओ योजना’ (PM Kisan FPO Scheme) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला (Farmer Producers Association) 15 लाख रुपये दिले जाणार आहेत. नवीन कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे (Agricultural Equipment) किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणे सोपे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठी मदत होईल.

कसा कराल अर्ज?
• सर्व प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
• आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
आता होम पेजवर FPO च्या पर्यायावर क्लिक करा.
• आता तुम्ही ‘Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
• आता तुमच्या समोर नोंदणी फॉर्म उघडेल.
• आता फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.
• यानंतर, तुम्ही स्कॅन केलेले पासबुक अपलोड करा किंवा चेक आणि आयडी प्रूफ रद्द करा.
• आता तुम्ही सबमिट पर्यायावर क्लिक करा.

वाचा: महाराष्ट्रातील ‘या’ भागांत होणार पावसाची जबरदस्त बॅटिंग! नागरिकांसह शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन, पिकाचं होऊ शकत मोठं नुकसान

लॉगिन करण्याची प्रक्रिया
• तुम्हाला लॉग इन करायचे असल्यास, सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
• आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
• यानंतर तुम्ही FPO च्या पर्यायावर क्लिक करा.
• आता तुम्ही login च्या पर्यायावर क्लिक करा.
• यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.
• आता त्यात युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
• याच्या मदतीने तुम्ही लॉग इन करू शकाल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for the beneficiaries of PM Kisan! Modi government will give as much as 15 lakhs to farmers; Know and apply immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button