ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Pesticides | शेतकऱ्यांच्या ‘पांढऱ्या अळी’ आणि ‘दीमख’च्या चिंतेवर मात करणारा ‘टर्नर’ लाँच!

Pesticides | इनसेक्टीसाइड्स (इंडिया) लिमिटेड (आयआयएल), ही भारतातील आघाडीची पीक प्रोटेक्शन आणि न्यूट्रिशन कंपनी, शेतकऱ्यांना मोठी पीडा देणाऱ्या पांढऱ्या अळी आणि दीमखांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘टर्नर’ नावाचा अतिशय प्रभावी किटकनाशक (Pesticides) बाजारात आणत आहे. ‘टर्नर’ हे पेटंटेड अत्याधुनिक किटकनाशक विविध शेती उत्पादनांवर या किडी आणि दीमखांचा प्रभावी रीत्या नाश करण्यासाठी उपयुक्त आहे.

टर्नर हे व्यापक (broad-spectrum) असे किटकनाशक असून ते जमिनीला स्पर्श करताच, खाल्ले गेल्यावर आणि अळी, दीमख यांना दूर राहण्यास प्रेरित करून त्यांचा प्रभावी नाश करते. यामुळे शेतकऱ्यांना या पिकांवर होणाऱ्या नुकसानीपासून दूर राहण्यासा दीर्घकालीन संरक्षण मिळणार आहे.

आयआयएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अग्रवाल यांनी या नवीन उत्पादनाची माहिती देताना सांगितले, “आयआयएलमध्ये, आम्ही बळकट संशोधन आणि विकास (R&D) टीमच्या माध्यमातून भारतीया शेतकऱ्यांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक जागतिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण, टिकाऊ सोल्यूशन्स शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहोत. ‘टर्नर’ ही किटक नियंत्रण क्षेत्रात क्रांतिकारी असलेली तंत्रज्ञान आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्यात आणि चांगली पिक घेण्यात मदत होईल, याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत.”

वाचा| Crop Loan | शेतकऱ्यांनो आता पीक कर्जाची फक्त मुद्दलचं द्या! जिल्हा मध्यवर्ती बँकांना राज्य सहकारी विभागाचे निर्देश

“भारतीय शेतकऱ्यांना दर्जेदार आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांना सर्वोत्तम दर्जा आणि परवडणाऱ्या दरात हे प्रभावी किटकनाशक उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे अग्रवाल पुढे म्हणाले.

इनसेक्टीसाइड्स (इंडिया) ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या पीक संरक्षण आणि पोषण कंपन्यांपैकी एक असून पीक संरक्षण क्षेत्रात आघाडीवर आहे. कंपनीचा ‘ट्रॅक्टर ब्रँड’ शेतकऱ्यांमध्ये मोठा लोकप्रिय आहे. हा ब्रँड कंपनीच्या शेतकरी समाजाशी असलेल्या जवळच्या नातेसंबंधाचेही प्रतीक आहे. आयआयएलच्या इतर प्रमुख उत्पादनांमध्ये पल्सर, ग्रीन लेबल, शिनवा, मिशन, लीथल गोल्ड, हरक्यूलिस, सोफिया, हाचीमन आणि कुनोइची यांचा समावेश आहे.

Web Title | Pesticides | ‘Turner’ launched to overcome the ‘white worm’ and ‘termite’ concerns of farmers!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button