ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Crop Loan | शेतकऱ्यांनो आता पीक कर्जाची फक्त मुद्दलचं द्या! जिल्हा मध्यवर्ती बँकांना राज्य सहकारी विभागाचे निर्देश

Crop Loan | Farmers now pay only the principal of the crop loan! State Cooperative Department Instructions to District Central Banks

Crop Loan | मार्च महिन्याच्या अखेरीस जवळ आल्याने बँकांनी शेतकऱ्यांकडे पीककर्ज वसूलीसाठी तगादा लावला आहे. परंतु, नियमित आणि मुदतीत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांच्या पीककर्जातील (Crop Loan) फक्त मुद्दल रक्कम वसुल करण्याचे निर्देश राज्य सहकारी विभागानं जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिले आहेत.

यंदा राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक अडचणींचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

वाचा|गाळमुक्त Anil आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी ५.०८ कोटींचा निधी मंजूर! ‘या’ जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७९ ‘अ’ मधील अधिकारांतर्गत त्रिस्तरीय पतपुरवठा करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती आणि प्राथमिक कृषी पत पुरवठा संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, पीक कर्जाची परतफेड शेतकरी दरवर्षी मुदतीत करत असतील तर त्या शेतकऱ्यांना व्याज रक्कम कपात करून कर्जाची मुद्दल रक्कम वसूल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा लाभ द्यावा आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पीक कर्जासाठी पात्र ठरवावं, अशीही सूचना केली आहे.

राज्यात शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं पीक कर्ज सहकारी बँकाकडून मिळतं. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका सर्वाधिक पीक कर्जवाटप करत असतात. मात्र आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच मार्च अखेर शेतकऱ्यांच्या मागे वसूलीचा धोशा लावला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा छळ होतो. परंतु यंदा मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधील नाराजी निवडणुकीत भोवणार नाही, यासाठी राज्य सरकारनं निर्णयांचा सपाटा लावला आहे.

दरम्यान राज्य सरकारनं वेळेत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु अजूनही या योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं शेतकरी संघटनांकडून तक्रारी होत आहेत.

Web Title | Crop Loan | Farmers now pay only the principal of the crop loan! State Cooperative Department Instructions to District Central Banks

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button