ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Agriculture | शेती व्यवसायात येणार नवी आधुनिकता; नरेंद्र मोदींनी केली नव्या अभियानाची घोषणा…

Agriculture | शेती व्यवसयात किटकनाशक फवारणी, जमिनीच्या नोंदींचे दस्तऐवजीकरण, भाजीपाला, मासे, फळे शेतातून थेट बाजारपेठेत घेऊ जाण्यासाठी ड्रोनचा उपयोग होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) परिश्रम कमी होणार असून योग्य वेळी शेतीकामे होणार आहेत.

वाचा – भारतात एचटीबीटी कॉटन उत्पादित करण्यासाठी भारत सरकार अनुकूल, कापूस उत्पादकांचे उत्पन्न होणार दुप्पट…

ड्रोनचा उपयोग शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार:

ड्रोनचा उपयोग भारतामध्ये एकदम प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनचा (dron) वापर महत्वपूर्ण ठरत आहे. ड्रोन सेक्टरची क्षमता पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एका विशेष अभिनयाची घोषणा केली आहे. या अभिनया अंतर्गत व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे, भारताच्या (india) विविध शहरांमधील शेतांमध्ये कीटकनाशक फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या १०० ड्रोनसाठी पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.

वाचा – रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना बँकेची कामे आटपून घेण्यासाठी दिल्या सूचना; मार्चमध्ये 13 दिवस बँक बंद राहणार..

मोदींची शेती क्षेत्राला चालना देणारी घोषणा:

यावेळी पीएम मोदी म्हणाले की, २१व्या शतकातील आधुनिक कृषी सुविधांच्या दिशेने हा नवा अध्याय आहे. मला खात्री आहे की, हे प्रक्षेपण ड्रोन क्षेत्राच्या विकासासाठी केवळ मैलाचा दगड ठरणार नाही, तर अमर्याद शक्यतांचे आकाशही खुले करेल. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, ड्रोनच्या नावावर आधी असे,वाटले होते की ही सैन्याशी संबंधित यंत्रणा आहे किंवा शत्रूंविरुद्ध लढण्यासाठी वापरली जाणारी वस्तू आहे. मात्र आता त्याचा वापर शेती क्षेत्राला चालना देणारा ठरेल.

तरुणांना रोजगाराची संधी कशी मिळू शकते?

ज्याची संख्या लवकरच २०० च्या पुढे जाईल. त्याचसोबत तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारतातील वाढत्या ड्रोन (dron) क्षमतेबाबत पीएम मोदी म्हणाले की, मला सांगण्यात आले आहे की गरुड एरोस्पेसने पुढील 2 वर्षांत 1 लाख मेड इन इंडिया ड्रोन बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे तरुणांसाठी नवीन रोजगार आणि नवीन संधी निर्माण होतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button