ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Pashu Kisan Credit Card Yojana| तुमच्याकडेही गाई -म्हशी आहेत?; या योजनेतून मिळणार तब्बल इतके पैसे, जाणून घ्या सविस्तर

Pashu Kisan Credit Card Yojana | Do you also have cows and buffaloes ?; You will get a lot of money from this scheme, find out the details

प्राचीन काळापासून भारतात शेतीला प्राधान्य दिले जाते. तसेच भारतात शेती हा प्राथमिक व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणावर लोकं ही शेतीवर अवलंबून असते. मात्र अनेकदा विविध अडचणींवर शेतकऱ्यांना मात करावा लागतो. कधी नैसर्गिक संकट, अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर उभ्या असतात. देखील सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना (Government Schemes) सुरु केल्या आहेत.

पशू किसान क्रेडिट कार्ड योजना :

केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी तयार केलेल्या धोरणातून पशू किसान क्रेडिट कार्ड योजना (Pashu Kisan Credit Card Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गायी, म्हशी, शेळ्या/मेंढ्या, कोंबड्या पाळणाऱ्यांसाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

अशी मिळणार मदत :

पशू किसान क्रेडिट कार्ड या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज मिळते. यात प्रत्येक वेगवेगळ्या जनावरांसाठी कर्जाची रक्कम ठरविण्यात आली आहे. यानुसार गाईसाठी 40783 रुपये, म्हैससाठी 60249 रुपये, शेळी/मेंढ्यासाठी 4063 रुपये, कोंबडीसाठी 720 रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

असे मिळेल कर्ज :

पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेत सरकार शेतकऱ्यांना पशुपालनासाठी कमी व्याजदरात कर्ज देते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा शासनाच्या वतीने ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश आहे.

वाचा – शेतीलाच बनवले कृषी विद्यापीठ; कापसाच्या एवढ्या जाती काढल्या शोधून, वाचा नक्की कशा आहेत या जाती_

या पद्धतीने मिळणार पैसे :

शासनाकडून संबंधित जनावरासाठी निश्चित केलेली रक्कम 6 समान हप्त्यांमध्ये मिळणार आहे. जसे की तुमच्याकडे गाय आहे तर त्यासाठी 6797 रुपये प्रति हप्त्याने उपलब्ध आहे. दरम्यान पहिला हप्ता मिळाल्याच्या दिवसापासून कर्जाचा कालावधी ठरवला जाणार आहे.

या योजनेचे फायदे :

पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेची आपण माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आता आपण या योजनेचे फायदे पाहूयात. या
क्रेडिट कार्डचा वापर शेतकरी बँकेत डेबिट कार्ड म्हणून करू शकतात. तसेच या योजनेअंतर्गत क्रेडिट कार्ड असलेला शेतकरी 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही सुरक्षेशिवाय घेऊ शकतात. तसेच पशुपालक असलेल्यांना सर्व बँकांकडून 7 टक्के वार्षिक व्याजाने कर्ज दिले जाते. इतकेच नाही तर निश्चित वेळेवर व्याज भरल्यास 3 टक्के सूट देखील मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता :

पशुपालकाकडे सबंधित पशुचे आरोग्य प्रमाणपत्र असावे. तसेच
ज्या जनावरांचा विमा काढला आहे त्यांनाच कर्ज मिळेल.

योजनेत मिळणारी कर्जाची रक्कम :

गाय: ₹ 40,783/-
म्हैस: ₹ 60,249/-
मेंढ्या आणि शेळ्यांसाठी: ₹ 4,063/-
कुक्कुटपालनासाठी: ₹ 720/-

अशी करा नोंदणी :

पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीने जवळच्या बँकेत जाऊन
अर्जासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडून बँकेत अर्ज भरावा लागेल. सदर
अर्जामध्ये दिलेल्या सर्व बाबींची पूर्तता करावी लागेल.
सर्व आवश्यक कागदपत्र जोडून सदर अर्ज बँक अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल. या
अर्जाची पडताळणी झाल्यानंतर एक महिन्यानंतर, तुम्हाला प्राणी क्रेडिट कार्ड मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा


कमी क्षेत्रात बक्कळ पैसा कमवायचा आहे, तर ही शेती करा दररोज मिळेल उत्पन्न…

शेतात राबवा वेगवेगळे प्रयोग; अन भाजीपाल्यातून कमवा लाखो रुपये…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button