ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Diesel Subsidy | खरचं की काय! आता मशागतीसाठी शेतकऱ्यांना थेट डिझेलसाठीच मिळणार अनुदान? जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार

सध्या रशिया युक्रेन यांच्यात चाललेल्या युद्धाचा परिणाम भारतातील वस्तूंवर देखील दिसून येत आहे. या युद्धामुळे भारतील सोन्या चांदीच्या दरासह इंधनाचे दर देखील गगनाला भिडले आहेत.

Diesel Subsidy | त्याच बरोबर प्रचंड महागाई देखील होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आता याचा फटका थेट शेतकऱ्यांना देखील बसत आहे. कारण इंधनात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक प्रकारे शेती (Agriculture) करताना त्यांचे बजेट ढासळत आहे. कारण इंधनाच्या वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरद्वारे (Tractor) मशागत करण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना डिझेलचे अनुदान देण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

वाचाखुशखबर! पीक विमा योजनेअंतर्गत राज्य शासनाने खरीप हंगाम 2021 साठी विमा कंपन्यांना दिली ‘इतक्या’ कोटींची मंजुरी…

इंधन दरात वाढ झाल्यामुळे मशागतीच्या रकमेत झाली वाढ
देशभरात इंधन वाढल्यामुळे याचा परिणाम वाहनांवर होताना दिसून येत आहे. कारण इंधन वाढल्यामुळे सर्वसामान्यांना देखील काही अंतर पार करण्यासाठी अधिक इंधनासाठी जास्त रक्कम मोजावी लागत आहे. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना देखील ट्रॅक्टरने मशागत करण्यासाठी प्रति एकर 200 रुपये अधिकचे घालवावे लागत आहेत.

डिझेलची दरवाढीमुळे शेतकऱ्यांकडून उखडले जातायत अधिक पैसे
तर अनेक भागांमध्ये डिझेलचा दरामध्ये वाढ झाल्याने झाल्याचे सांगून शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे काढले जात आहेत. याचमुळे आता शेतकऱ्यांना याचा अधिकच आर्थिक फटका बसत आहे. मशागतीच्या (Cultivation) पैशांमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्याचे बजत देखील ढासळत असून, सुरुवातीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात येईल.

वाचा: Cows Subsidy । काय सांगता गाय खरेदीलाही अनुदान मिळते? अनुदानात अधिकाऱ्यांची अपराटपर पाहून थेट पशुसंवर्धन मंत्र्यांनीच दिले चौकशीचे आदेश; पाहा काय आहे योजना…

मोठ्या प्रमाणात खर्च येऊनही बाजारभाव नाही
शेतकरी शेती करताना मोठ्या प्रमाणात खर्च करतो. पिकाचे बियाणे (Crop seeds) असेल, खते असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या फवारण्या, मशागती यांमध्ये शेतकरी यामध्ये बराचसा पैसा खर्च करतो. त्याचबरोबर मशागत करताना शेतकरी रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, पंजी, नांगरट यासारख्या अनेक मशागती तो ट्रॅक्टरद्वारे करतो. पूर्वी बैलाने नांगरट केली जात होती त्यामुळे शेतकऱ्यांना इंधनाचा खर्च येत नव्हता. त्यामुळे पिकास बाजारभाव मिळाला नाही, तरी एवढा फरक पडत नव्हता. परंतू, आता मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवावे लागतात. त्यानंतर बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसतो.

आता डिझेलसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान?

वरील सर्व बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांना ज्या प्रकारे आर्थिक झळ सोसावी लागत आहे त्याचा विचार आता केला जात आहे. वेळोवेळी गरज पडणाऱ्या ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळावे याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button