ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

New sand policy| घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळणार फुकट, ‘या’ जिल्ह्यात पहिले वाळू गट मंजूर

New sand policy| मध्यंतरी सरकारनं नवीन रेती धोरण जाहीर केलं होतं. अवैध वाळू उपशाला लगाम घालावा आणि नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी असा उद्देश या धोरणामागे होता. या धोरणाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यानं यात आघाडी घेऊन जिल्ह्यात पहिले वाळू गट आणि डेपो स्थापन केले आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ वाळू गट व तीन डेपो स्थापन झाले आहेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी याला मंजुरी दिली आहे. व्यवस्थापनासाठी 21 ते 27 एप्रिल या दरम्यान निविदा मागवण्यात आल्या आहेत.

वाचाशिंदे फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय, ‘हे’ साखर कारखाने ठरणार कर्जासाठी अपात्र

काय असणार वाळूचा दर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन रेती धोरण जाहीर करण्यात आलं होतं या धोरणानुसार ग्राहकांना वाळूसाठी प्रतिब्रास सहाशे रुपये मोजावे लागणार आहेत. हे पैसे महसूल विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्टर करून भरावे लागणार आहेत. यासाठी तालुका स्तरावरील समिती नेमण्यात येणार आहे. तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष असतील. वैज्ञानिक, गटविकास अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा या समितीत समावेश असेल. एक मे पासून 600 रुपयात घरपोच वाळू देण्यात येणार आहे.

घरकुल लाभार्थ्यांना वाळू मोफत

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना वाळू मोफत मिळणार आहे असा शासन निर्णय आहे मात्र या वाळूच्या वाहतुकीचा खर्च हा द्यावा लागणार आहे. ही वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा सहा चाकी वाहनाचा वापर करणे बंधनकारक आहे जर अन्य वाहनाचा वापर केला तर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. वाळू लिलाव आणि अन्य प्रक्रियेसाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असणार आहेत. घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू दिल्यामुळे त्यांच्या घर बांधण्याच्या खर्चात बचत होणार आहे.

वाचाआता शेतीला मिळणार दिवसा वीज, राज्य मंत्रीमंडळाचा ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

जिल्ह्यातील वाळू गट आणि डेपो

नवीन रेती धोरण लागू करण्यात अहमदनगर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नऊ वाळू गट आणि तीन वाळू डेपो यांना मंजुरी दिले आहे. गोदावरी सीना नानी विसरला या नद्यांमध्ये नऊ वाळू गटांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे श्रीरामपूर तालुक्यात नायगाव दोन तर मातुलठाण तीन आणि शेगाव तालुक्यात मुंगी आणि खरडगाव असे दोन वाळूचे गट आहेत. शेवगाव तालुक्यातील चापडगाव, श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव आणि जामखेड तालुक्यातील चोंडी येथे वाळू डेपो निश्चित करण्यात आले आहेत. या वाळू गटातून 81 हजार 82 ब्रास इतकी वाळू उत्खननास उपलब्ध होणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button