ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

NASA | काय सांगता? चंद्रावरून आणलेल्या मातीत लावलं झाडं, ‘या’ मुळे घेण्यात आली चाचणी..

मानसाने अग्नी आणि चाकाचा शोध लावण्यापासून ते चंद्रापर्यंत पोहोचण्यापर्यंत अनेक मोठे यश प्राप्त केले आहे.

NASA | यामध्ये चंद्रावर (Moon) मानवी वसाहत (Human settlement) निर्माण करणे सोपी गोष्ट नाही. कारण, कोठेही शहर (City) वसवायचे असेल, तर त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंमध्ये ( Essentials) प्रथम अन्नाचा (Food) क्रमांक लागतो. त्यासाठी वसाहत निर्माण करण्याच्या ठिकाणची माती सुपीक (Fertile soil) झाली नाही, तर पीक कुठून येणार? असा प्रश्न उद्भवतो. मात्र, आता या विक्रमाच्या यादीत भर पडली आहे. चंद्रावरच्या मातीत प्रथमच वनस्पती वाढवण्यात वैज्ञानिकांना आता यश आले आहे. हे सोपे काम नव्हते पण ते वैज्ञानिकांनी (Scientific) यशस्वी करून दाखवले आहे.

चंद्रावरील मातीत लावलं झाड

अमेरिकेतील (US) ‘नासा’ (NASA) या अंतराळ संस्थेने चंद्रावरून आणलेल्या मातीत रोप उगवण्याचा शोध यशस्वी केला आहे. दरम्यान, चंद्रावरील ही माती अलीकडेच नासाच्या अपोलो अंतराळवीरांनी त्यांच्यासोबत आणली होती. दरम्यान, या संशोधनामुळे आता चंद्रावर अन्न आणि ऑक्सिजन तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये व भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी हे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

चंद्रावरील मातीत पिके घेण्यासाठी घेतली चाचणी

चंद्रावर पिके वाढवणे सोपे होणार नाही. कारण, चंद्राची माती, ज्याला ‘लुनर रेगोलिथ’ असे म्हणतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या मातीपेक्षा खूप वेगळी आहे. कारण, चंद्रावरील माती ही खडकाळ आहे. लांब अंतराळ प्रवासावेळी चंद्रावर ताजे अन्न उपलब्ध होणार नाही. तसेच, तुम्ही पृथ्वीची माती काढून तेथे घेऊन जाऊ शकत नाही. कारण ती अतिशय खर्चिक बाब आहे. म्हणूनच चंद्राच्या मातीवर पिके घेण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली आहे.

चंद्रावरील मातीत वाढू शकते अंकुर

फ्लोरिडा विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ फूड अँड अँग्रीकल्चरल सायन्सेसचे रॉबर्ट फेरेल म्हणाले, अपोलो चंद्र रेगोलिथमध्ये उगवलेली वनस्पती ट्रान्सक्रिप्टोम्स निर्माण करते. जे चंद्रावर होत असलेल्या सर्व संशोधनांना नवीन सकारात्मक दिशा देत आहेत.” हे सिद्ध होते की चंद्राच्या मातीमध्ये रोपे यशस्वीरित्या अंकुर वाढू शकतात. तसेच, रॉबर्ट फेरेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपोलो ११ च्या नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन आणि इतर मूनवॉकर्सने आणलेल्या चंद्राच्या मातीत अरबीडोप्सिसच्या बिया लावून त्या सर्व बिया अंकुरल्या आहेत.

वाचा: Corona | बाप रे! कोरोनातून बऱ्या झालेल्या 50 टक्के रुग्णांना उद्भवतायत ‘ही’ लक्षणे

याबाबत नासाचे प्रमुख बिल नेल्सन म्हणाले, “नासाच्या भविष्यातील मानवी शोधाच्या उद्दिष्टांसाठी हे संशोधन महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला भविष्यातील अंतराळवीरांना चंद्रावर राहण्यासाठी आणि तेथे काम करण्यासाठी अन्न स्रोत विकसित करण्याची गरज आहे. तसेच, १९७२ नंतर प्रथमच, २०२५ च्या नियोजित मोहिमेमध्ये ‘नासा’ने मानवांना चंद्रावर उतरवण्याची योजना आखली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button