ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Agriculture | कृषी अवजारांचे यंत्र, तंत्र आणि मंत्र, जाणून घ्या खत टाकणीचे पारंपरिक यंत्र

नमस्कार बांधवांनो आपन शेतकरीच मातीला मायं मानणारे लोकं! शेतीमधे परंपरागत पद्धतीला नाविन्यपूर्ण यंत्राची (Machine) जोड जर मिळाली तर वेगळं शेतीच (Agriculture) चित्र वेगळे दिसेल.

Agriculture | खर तर, आपण शेतीला नवीन राष्ट्र आणि संशोधनाची जोड दिली, तर शेती अजूनही उत्तम उत्पन्न देणारंच! मला अशाच शेतीबद्दल कृषी यंत्र (Agricultural machinery) बनवणारा व शेतीमध्ये सुधारीत तंत्र आणणाऱ्या माणसाबद्दल सांगायचे आहे. तो म्हणजे नामदेव आनंदराव वैद्य हे नाव महाराष्ट्रासाठी (Maharashtra) नवीन नाही. जेव्हा हा माणूस कृषी क्षेत्रात (Agricultural sector) आला तर त्याने स्वताच्या शेतीच चित्र बदलण्यासाठी काय करावे हा प्रश्न पडला व त्याच वेळेस मनात कल्पना सुचली की, आपण काही नविन करु शकतो व त्या वेळेस मजुरांचा अभाव होता.

बैल जोडीवर बनवले खत टाकण्याचे यंत्र
५० एकर शेतीला खत (Fertilizer) टाकण्यास मजुर न मिळाल्याने त्याचवेळेस बैल जोडी वरचं खत टाकण्याच यंत्र बनविले. त्याचा पहीला प्रयोग शेतीत केला आणि तो यशस्वी झाला. स्वतः लाच म्हणाला होय नामदेव तु हे करु शकतो. स्वताच्या पाठीवर स्वताच थाप मारनारा व लोकांनी वेड्यात काढलेला मानुस आज अभ्यासाच्या पुस्तकात आहे. या तरुण शेतकऱ्याच्या कर्तृत्वाची दखल घेत कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्लीला पाठवले. येथे प्रात्यक्षिक दाखवले व तेथे यांनी आपले नाव कमावले हे विशेष आहे.

वाचा: Fall Army Worm | अमेरिकन लष्करी अळीची चिंताच मिटली? जाणून घ्या काय आहे नवीन ‘जीएम’ तंत्रज्ञान

कृषी पुरस्कार
आपला देश हा कृषी प्रधान आहे व तो राहावा हाच त्यांचा ध्यास असतो. केवळ मजुरांवर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेवून वेगवेगळ्या कशा पद्धतीने यशस्वी होतील यासाठी ते प्रयत्नशील होते. त्या अनेक पुरस्कार मिळाले असले तरी अन्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती देणे आणि नव नवीन माहिती घेणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या या कार्याची पंचक्रोशीत ओळख आहे व त्या २०२१ चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार सुद्धा भेटला आहे. त्याप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.

वाचा: Potato Production | बटाट्याचा नादखुळा स्वॅग! आता जमिनीतच नाहीतर थेट हवेत येणार पिक, वाचा एरोपोनिक तंत्रज्ञान

प्रगतशील शेतकरी यशोगाथा
अशाचवेळी बातमी आली ती म्हणजे महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी यांचे पुस्तक प्रकाशित झाले. ते म्हणजे कृषी विवेक या पुस्तकात महाराष्ट्रामधील ३० प्रगतशील शेतकरी यांची यशोगाथा प्रकाशित झाली महत्वाचं म्हणजे आमचे मित्र श्री नामदेव आनंदराव वैद्य यांची सुद्धा त्यामध्ये यशोगाथा आहे. आपल्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे व आपण हे पुस्तक वाचावेच असे मला वाटते…. धन्यवाद..!

माझे मित्र व भाऊ
श्री नामदेवराव आनंदराव वैद्य
9890723161
Save the soil all together
मिलिंद जि. गोदे
Mission agriculture soil information
9423361185

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button