ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Namo Shetkari Scheme | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता ‘या’ तारखेला येणार खात्यावर

Namo Shetkari Scheme | Good news for farmers! The second installment of Namo Shetkari Mahasanman Yojana will be credited to the account on 'this' date

Namo Shetkari Scheme | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा (Namo Shetkari Scheme) दुसरा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये आर्थिक (Financial) मदत देते. यामध्ये ३ हप्त्यात प्रत्येकी २ हजार रुपये दिले जातात. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै २०२३ या काळात जमा करण्यात आला होता. आता दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा होणार आहे.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दुसऱ्या हप्त्यासाठी १ हजार ७९२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. ९० लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेमुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत १३ लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.

वाचा | ATM Card Insurance | काय सांगता? एटीएम कार्डवर मिळणार तीन कोटी; लगेच जाणून घ्या नेमकी काय आहे स्कीम…

  • योजनेचे फायदे:
  • शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
  • शेतीसाठी आवश्यक खर्च करण्यास मदत होते.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
  • योजनेसाठी पात्रता:
  • शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याच्या नावावर ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज कसा करावा?
  • शेतकऱ्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज जमा करावा.

Web Title | Namo Shetkari Scheme | Good news for farmers! The second installment of Namo Shetkari Mahasanman Yojana will be credited to the account on ‘this’ date

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button