ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Namo Shetkari | नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ अटी त्वरित पूर्ण करा ; अन्यथा होऊ शकते नुकसान !

Namo Shetkari |देशातील शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासासाठी सरकार अनेक योजना राबवित असते. केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना‘ (PM Kisan Scheme) सुरू केली होती. सरकारच्या अनेक महत्वकांक्षी योजनांमध्ये या योजनेचा समावेश होतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.

नमो शेतकरी महासन्मान योजना

देशातील करोडो शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ( State Government) सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या चालू आर्थिक वर्षापासून ही योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे.

वाचा: आधार कार्ड पॅनकार्ड सोबत लिंक करणे झाले आता सोप्पे ! मोबाईल वरून करा फक्त एक एसएमएस_

१६०० कोटींची तरतूद

नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ८३ लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी राज्यसरकारने जवळपास १६०० कोटींची तरतूद केली आहे.

मे मध्ये शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये

महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ( Namo Shetkari Mahasanman Yojana) आणि केंद्रसरकारच्या पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता सुद्धा याच महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे मे मध्ये शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहेत.

या अटींची पूर्तता कराच

परंतु राज्यसरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा फायदा घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही.

१) शेतकऱ्यांच्या नावे १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमिनीची नोंद असणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांची अशी नोंद आहे , तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

२) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक करावे लागणार आहे.

३) नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी लागणार आहे.

४) ई केवायसी (E KYC) करणे देखील बंधनकारक असणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Requirments for NamoShetkari Mahasnman Yojana’s first installment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button