lang="en-US"> ब्रेकिंग न्यूज: अखेर मुहूर्त लागलाच! येत्या दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत - मी E-शेतकरी

Weather | ब्रेकिंग न्यूज: अखेर मुहूर्त लागलाच! येत्या दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार मेघराजा

उन्हाळा संपून पावसाळा सुरू झालाय पण तो केवळ नावापुरताच. कारण राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने (Rain) दांडी मारली आहे.

Weather | तर काही भागांमध्ये मेघराजा जोरदार बरसला आहे. यामुळे शेतकरी (Farmer) राजा देखील चिंतेत पडला आहे. कारण खरिप हंगामाला (Kharif season) सुरुवात झाली आहे. परंतु अद्याप देखील योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांची पेरणी (Agricultural sowing) झाली नाही. तर कित्येक भागांतील नागरिकांना पावसापासून दिलासा मिळाला नाही. त्याचबरोबर मुंबईसोबतच (Mumbai) उपनगर व ठाणे परिसरात जोरदार पावसाने (Heavy rain showers) हजेरी लावली आहे.

पुढच्या 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता
सतत लपंडाव खेळणारा पावसाचा येत्या 3 ते 4 दिवसांत दक्षिण कोकणात वेग वाढण्याची शक्यता आहे. असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचवेळी हवामान विभागाकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुण्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर येत्या दोन दिवसांत कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वाचा: Kharif Season | शेतकऱ्यांनो पाऊस लांबलाय ‘या’ तारखेपर्यंत पेरणीची घाई करू नका; कृषी विभाग

पावसामुळे पेरण्या खोळंबल्या
राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस योग्य प्रमाणात पडला नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला येणारा पाऊस जून अखेरपर्यंत देखील सम प्रमाणात दाखल झाला नाही. त्याचमुळे शेतकऱ्यांना अद्याप पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी करता येत नाहीये.

वाचा: Kharif Season | शेतकऱ्यांनो पाऊस लांबलाय ‘या’ तारखेपर्यंत पेरणीची घाई करू नका; कृषी विभाग

पेरणीसाठी किती पाऊस अपेक्षित?
खरिपातील पेरणीसाठी 75 ते 100 मि. मि. पाऊस पडणे अपेक्षित आहे. इतका पाऊस झाल्यानंतर जमिनीत पेरणीयोग्य वाफसा सापडेल. तेव्हाच पीक चांगले येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी योग्य वाणाची निवड करून बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. यामुळे जरी पेरण्या उशिरा झाल्या तरी पीक उत्पादनात घट होणार नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढची दोन दिवसांत पाऊस चांगला झाला तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरेसा वाफसा मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Exit mobile version