ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | येत्या पाच दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार मेघराजा, पण शेतकऱ्यांच्या पेरणीचं काय?

यंदा मान्सून सर्वांशीच लपंडाव खेळत दिसून येत आहे. हवामान विभागाचा (Meteorological Department Forecast) अंदाज देखील पावसाने (Rain) धुडकावून लावला आहे.

Weather | सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे. मात्र पुरेसा पाऊस न पडल्याने पेरणी (Sowing) लांबणीवर गेली आहे. परंतु आता महाराष्ट्रात पाऊस जून अखेरपर्यंत दाखल झाला आहे. परंतु अद्यापही काही भागांत पुरेसा पाऊस झाला नाही. हुलकावणी देणाऱ्या पावसाची मंगळवारी रात्री मुंबईसह अनेक भागांत झलक दिसली. तर काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. आता हवामान विभागाव्दारे राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता
कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर तुरळक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील या पावसामुळे शेतीसाठी दिलासा मिळत आहे. आता हवामान विभागाकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत पाच दिवसमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वाचा: Kharif Season | शेतकऱ्यांनो पाऊस लांबलाय ‘या’ तारखेपर्यंत पेरणीची घाई करू नका; कृषी विभाग

वाचा: Weather | अखेर मेघराजा जोरदार कोसळणार! येत्या पाच दिवसात राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस

पावसामुळे पेरणी लांबणीवर
जून महिना निम्मा गेला तरीही मान्सून राज्यात अपेक्षित होता तेवढा दाखल झाला नाही. यामुळे यंदा मान्सून हा राज्यात उशिराच दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. राज्यात खरिप हंगामासाठी यंदा 146.85 लाख हेक्टरवर खरीप पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस लांबणीवर गेल्यामुळे हे नियोजन बिघडले असून पेरणी लांबणीवर गेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button