ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | राज्यावर दुष्काळाचं संकट, यंदा पाऊस कमी पडण्याचा हवमान विभागाचा अंदाज

सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा गोंधळ सुरू आहे.

Weather | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत अनेक आमदार गुवाहाटीला गेले आहेत. याचमुळे राज्य सरकार (State Government) पडतंय की का हा मोठा प्रश्न उभा राहिलाय. आता राज्यात नवे सरकार (Government) येणार राज्यातील सत्ता बदलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर एकीकडे सरकारचा बदलाचा प्रश्न समोर उभा आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोक्याचा त्रास संपण्याच नावच घेत नाहीये. होय आता शेतकऱ्याच्या पारड्यात आणखी एक संकट (Farmers New Crisis) पडण्याची शक्यता आहे. कारण यंदा राज्यात मेघराजा (Chance of low rainfall in the state this year) कमी बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
जून महिना संपायला आला तरी देखील राज्यात पूर्णपणे मान्सून दाखल झालेला नाही. सध्या, खरीप हंगाम सुरू होणार असून खरीप पिकांची पेरणी ही जून महिन्याच्या सुरवातीस केली जाते. मात्र, समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पूर्वमशागतीची कामे आवरून मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच यंदा मान्सून कमी बरसणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे.

वाचा: Weather | येत्या पाच दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार मेघराजा, पण शेतकऱ्यांच्या पेरणीचं काय?

….तर राज्यात दुष्काळाचे संकट राहणार उभा
राज्यात मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुढील महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात समाधानकारक पाऊस झाली नाही तर राज्यात दुष्काळाचे संकट ओढवणार असल्याचा अंदाज तज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविला आहे. यामुळे आता राज्यात अपेक्षित पाऊस पडणे गरजेचे आहे.

वाचा: Weather | अखेर मेघराजा जोरदार कोसळणार! येत्या पाच दिवसात राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस

थेट शेतकऱ्याच्या पीक कर्जावर होणार परिणाम
राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकरी पीक कर्ज काढत असतात. मात्र, सध्याचा प्रतिकूल परिस्थिती पाहता शेतकरी स्वतःहून पीक कर्ज काढण्याकडे पाठ फिरवत आहेत. तसेच, याअगोदर, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जावर जिल्हा बँकांना प्राप्त होणारे 2 टक्के व्याज परतावा अनुदान हे आर्थिक वर्ष 2022-23 या चालू वर्षापासून बंद करण्यात आले आहे. हे अनुदान बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तसेच, खरीप हंगामात बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू आहे. मात्र, समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पेरणी आता लांबणीवर गेली असून यामुळे पिकाचे उत्पादन काढणी देखील लांबणीवर जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button