ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Milk Price | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतात.

Milk Price | दुग्धव्यवसाय करून शेतकऱ्यांना आपली आर्थिक (Financial) स्थिती सुधारण्यास मदत होते. आता दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता गोकुळकडून (Gokul) शेतकऱ्यांच्या गाय आणि म्हशीच्या दुध (Milk Price) खरेदी दरात 1 ऑगस्टपासून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी (Agriculture) याचा चांगला फायदा होणार आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दूध खरेदी दरात वाढ
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक म्हणजेच गोकुळशी संलग्न असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय आणि म्हशीच्या खरेदी दरात वाढ केली आहे. त्याचवेळी म्हशीच्या प्रतिलिटर दुध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ तर गायीच्या प्रतिलिटर दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

वाचा: Poultry Farming | शेतकऱ्यांनो देशी कोंबड्या पाळून मिळवा लाखोंचा नफा, सरकार ‘या’ योजनेंतर्गत देतयं 50 टक्के अनुदान

फॅटनुसार मिळणार दर
आता शेतकऱ्यांच्या दुधाला आजपासून दरवाढ मिळाल्यानंतर आणखी एक नवा बदल झाला आहे. तर आजपासून म्हशीचा दुध खरेदी दर 6.0 फॅट असेल, तर 9.0 एस. एन. एफ. प्रतीचे दूध असल्यास त्या दुधाला प्रतिलिटर 45.50 दर मिळणार आहे. त्याचप्रमाणे गायीचा दुध खरेदी दर हा 3.5 आणि 8.5 एस. एन. एफ. या प्रतीचे असल्यास 30 रुपये मिळेल. यासंदर्भात गोकुळ संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: बायोमास स्टोवसाठी ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय 100 टक्के अनुदान, लाभासाठी जाणून घ्या पात्रता

कोणत्या दुग्ध वस्तूंची झाली वाढ?
या निर्णयावेळीच आणखी एक दरवाढीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तर गोकुळ संघाच्या कोल्हापूर, आणि मुंबई या विभागांमध्ये विकल्या जाणाऱ्या फुल क्रीम प्रतीलिटर दुधाच्या विक्रीमध्ये 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. बाकी इतर दुग्ध वस्तूंच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आता गोकुळकडून दुध खरेदी दरात वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button