ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Economic change | सामान्यांच्या खिशाला कात्री! 1 जुलैपासून ‘या’ गोष्टी महागणार, जाणून काय होणार बदल

आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही गोष्टी 1 जुलैपासून म्हणजेच शुक्रवारपासून बदलत आहेत.

Economic change | यामध्ये क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवरील टीडीएस (TDS on cryptocurrency transactions), आधार-पॅन कार्ड लिंकिंग (Aadhar Card PAN Card Linking) आणि डीमॅट केवायसी (Demat KYC) इत्यादींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, गॅसच्या (LPG gas) किमतींमध्ये सुधारणा आणि इतर अनेक बदल देखील होऊ शकतात. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक
पॅन लिंकवर 1,000 शुल्क आता आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. आतापर्यंत 500 रुपये होते. मात्र, मार्चपर्यंत ते मोफत होते. मार्च 2023 पर्यंत पॅन लिंक न केल्यास ते निष्क्रिय होईल. आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ते स्वतः लिंक करू शकता.

वाचा: Mahindra Scorpio | शेतकऱ्यांची आवडती महिंद्रा स्कॉर्पिओ एन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि बुकिंग चार्जेस

डिमॅट खाते निष्क्रिय होईल
जर तुम्ही 30 जूनपर्यंत डीमॅट खात्याचे केवायसी केले नसेल तर ते आता निष्क्रिय होईल. म्हणजेच तुम्ही शेअर बाजारात खरेदी-विक्री करू शकणार नाही. तुम्ही शेअर विकत घेतले तरी ते तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जाणार नाही. केवायसी पूर्ण झाल्यानंतरच हे हस्तांतरण होईल.

दुचाकी आणि एसी
1 जुलैपासून महागड्या दुचाकींच्या किमती वाढणार आहेत. Hero Moto Corp 3,000 रुपयांपर्यंत किंमत वाढवणार आहे. इतर कंपन्याही किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. 5 स्टार एसी खरेदी करणे 10 टक्क्यांनी महाग होणार आहे.

क्रेडिट कार्ड न देण्याचे कारण द्यावे लागेल
1 जुलैपासून बँकांनी किंवा वित्तीय कंपन्यांना ग्राहकाच्या अर्जावर क्रेडिट कार्ड का दिले नाही, हे स्पष्ट करणे आवश्यक असेल. यासोबतच पर्यायाने विमा संरक्षणही द्यावे लागणार आहे. ग्राहकाच्या मान्यतेशिवाय कार्ड अपग्रेड करता येत नाही. चूक झाल्यास कार्ड जारी करणार्‍याला केवळ शुल्क परत करावे लागणार नाही, तर दंडही भरावा लागेल.

वाचा: Stock Market | शेअर मार्केटमध्ये पैशांचा पाऊस! ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ, तर सेन्सेक्स-निफ्टीलाही ग्रीन सिग्नल

डेबिट कार्डसाठी आरबीआयची मान्यता नाही
आता बँका कोणत्याही ग्राहकाला त्यांच्या बोर्डाच्या मान्यतेनेच डेबिट कार्ड जारी करू शकतात. यासाठी आरबीआयच्या परवानगीची गरज भासणार नाही. डेबिट कार्ड फक्त बचत आणि चालू खाते असलेल्या ग्राहकांना दिले जाईल. बँक कोणालाही जबरदस्तीने डेबिट कार्ड देऊ शकत नाही.

एलपीजी किमतीत बदल
गॅस सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या 1 तारखेला सुधारली जाते. सिलिंडरच्या किमती ज्या प्रकारे सातत्याने वाढत आहेत, ते पाहता 1 जुलै रोजी एलपीजीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button