ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Aadhaar-Pan Link | पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केलंय ना? 3 दिवसानंतर भरावा लागेल दुप्पट दंड, जाणून घ्या प्रक्रिया

पॅन कार्डला आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आता संपणार आहे. 30 जूननंतर पॅनला आधारशी लिंक (PAN Card Aadhar Card Link) केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल.

Aadhaar-Pan Link | त्यामुळे तुम्ही अद्याप हे काम पूर्ण केले नसेल तर तीन दिवसांत करा. जर तुम्ही 30 जूनपूर्वी तुमचा पॅन कार्ड (PAN card) आधार कार्डशी (AADHAAR CARD) लिंक केला असेल तर दंड कमी होईल. यापूर्वी यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु आधारशी पॅन लिंक (PAN Card Aadhar Card Link Penalty) करण्याची तारीख 500 रुपयांच्या दंडासह 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. 31 मार्चपूर्वी पॅन कार्डला आधारशी लिंक करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत होती.

अन्यथा भरावा लागेल 1000 रुपये दंड
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 234H नुसार 31 मार्च 2023 पर्यंत पॅनला आधारशी लिंक केल्यास 1000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. पुढील वर्षापर्यंत, तुमचा पॅन आधारशी लिंक न करताही काम करत राहील. यासह, तुम्हाला 2022-23 साठी आयटीआर आणि रिफंड प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. परंतु 31 मार्च 2023 नंतर, तुमचा पॅन निष्क्रिय केला जाईल. यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

वाचा: Mark Zuckerberg | अब कमाई छप्पर फाडके! फेसबुक-इंस्टाग्राम वापरकर्त्यांवर पैशांचा पाऊस, मार्क झुकरबर्गची घोषणा

आकारला जाऊ शकतो मोठा दंड
जर तुमचा पॅन एकदा निष्क्रिय झाला तर तुम्ही अनेक गोष्टी करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या पॅन कार्डने म्युच्युअल फंड, स्टॉक आणि बँक खाती उघडण्यासारख्या गोष्टी करू शकणार नाही. याशिवाय तुम्ही तुमचे बंद असलेले पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 72B अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

वाचा: July Banks Holidays | बँकधारकांनो बँकेची कामे उरका! जुलैमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद, ताबडतोब तपासा यादी

आधारशी पॅन लिंक कसे करावे?
• प्राप्तिकराच्या अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर लॉग इन करा.
• क्विक लिंक्स विभागात जा आणि आधार लिंक वर क्लिक करा.
• तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल.
• तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथे टाका.
• ‘मी माझे आधार तपशील प्रमाणित करतो’ हा पर्याय निवडा.
• तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल. ते भरा आणि नंतर ‘Validate’ वर क्लिक करा.
• दंड भरल्यानंतर तुमचा पॅन आणि आधार लिंक केला जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button