ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Gudi Padwa |गुढीपाडवा नवीन वर्षासाठी शुभ मुहूर्त आणि आनंदाची चाहूल!

8 एप्रिल 2024: गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात, आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस! या वर्षी, 9 एप्रिल रोजी मंगळवारी आपण हा उत्सव साजरा करणार आहोत. जरी 8 एप्रिल रोजी सूर्यग्रहण असले तरी ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही.

नवीन वर्षातील शुभ मुहूर्त:

  • अक्षय्य तृतीया: 10 मे, शुक्रवार
  • आषाढी एकादशी: 17 जुलै, बुधवार
  • गणेशोत्सव: 7 ते 17 सप्टेंबर
  • घटस्थापना: 3 ऑक्टोबर, गुरुवार
  • दसरा: 12 ऑक्टोबर, शनिवार
  • नरक चतुर्दशी: 31 ऑक्टोबर, गुरुवार
  • लक्ष्मीपूजन: 1 नोव्हेंबर, शुक्रवार
  • दिवाळी पाडवा: 2 नोव्हेंबर
  • भाऊबीज: 3 नोव्हेंबर
  • कार्तिंकी एकादशी: 12 नोव्हेंबर, मंगळवार
  • दत्तजयंती: 14 डिसेंबर
  • मकर संक्रांत: 14 जानेवारी, मंगळवार
  • महाशिवरात्री: 26 फेब्रुवारी, बुधवार

नवीन वर्षाची शुभेच्छा:

या वर्षी, ज्येष्ठ महिन्यात 25 जून रोजी अंगारक चतुर्थीचा योग आहे. मान्सूनचे आगमन वेळेवर होण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात 10 जूनपासून पाऊस सुरू होईल. जुलै आणि ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत, सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शनि साडेसाती:

29 मार्च 2025 पर्यंत शनि कुंभ राशीत असेल, त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशींना साडेसातीचा प्रभाव जाणवेल.

नववर्षाची शुभेच्छा:

साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि नववर्षाचा आरंभ दिन म्हणून गुढीपाडव्याचे महत्व अबाधित राहणार आहे. नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो ही सदिच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button