ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Loan Waiver | बिग ब्रेकिंग! 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, जाणून घ्या सविस्तर

Loan Waiver | शेती करताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते, यासाठी शेतकरी कर्ज काढतात. परंतु, आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही. तर काही शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात. पण शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिमुळे शेतकऱ्यांना या कर्जाची (Loan Waiver) परतफेड न केल्याने शेतीवर बोजा वाढतो. यामुळेच शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी (Loan Waiver) करण्यात येते. परंतु, काही जिल्ह्यातील शेतकरी या कर्जमाफी पासून वंचित राहिले आहे. याच शेतकऱ्यांसाठी आता राज्य शासनाने आनंदाची बातमी दिली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी देण्यात येणार आहे. कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला होता. याच त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ
कर्जमाफी न मिळालेल्या नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 580 शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहे, असे आश्‍वासन सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिले आहे. त्याचवेळी आमदार अशोक चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार माधवराव जवळगावकर हे उपस्थित होते.

काय म्हणले माजी मुख्यमंत्री?
अशोक चव्हाण म्हणाले की, “महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध बँकांच्या एक हजार 580 खातेदार शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. त्यांच्या कर्जखात्यावरील रक्कम व शासनाकडून आलेली कर्जमाफीची रक्कम यांचा ताळमेळ न जुळल्याने त्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही. या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून, त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम 25 ते 30 कोटी रुपये आहे.”

31 मार्चपूर्वी कर्जमाफी करावी
“राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट न पाहता 31 मार्चपूर्वी त्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, जेणेकरून त्यांना पुढील हंगामासाठी कर्ज मिळू शकेल,” असे अशोक चव्हाण म्हणाले. याचवेळी त्यांच्या या विधानावर उत्तर देताना सहकारमंत्री अतुल सावे यांनी सदर शेतकऱ्यांची 31 मार्चपर्यंत कर्जमाफी केली जाईल, असे सांगितले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Farmers will get loan waiver before March 31, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button