ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Farmers compensation| शेतकऱ्यांनो आता तुम्हाला मिळणार ‘इतकीच’ नुकसान भरपाई, सरकारचा घुमजाव; जाणून घ्या सविस्तर

Farmers compensation| गतसाली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. अतिवृष्टी, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यात विविध जिल्ह्यात शेती पिकांच्या झालेल्या नुकसानी करता बाधित शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या निकषाच्या दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता सरकारने आपल्या या निर्णयावरुन घुमजाव केलं आहे. हा निर्णय अचानक मागे घेत सामान्य दराने मदत मागणी करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

वाचाशिंदे फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय, ‘हे’ साखर कारखाने ठरणार कर्जासाठी अपात्र


जिरायत पिकांसाठी पूर्वीचे मदतीचे दर काय

जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी केली जाणारी मदत प्रचलित दराने म्हणजे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नुसार जी मदत दिली जात होती ती मदत होती प्रति हेक्टर 6 हजार 800 रुपये. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाते. या मदतीत सरकारनं दुप्पट वाढ केली.
प्रति 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये इतकी मदत सरकारनं जाहीर केली होती.

बागायती पिकांसाठी किती होती मदत

बागायत पिकांच्या नुकसानीसाठी दिली जाणारी मदत प्रचलित दरानुसार 13 हजार 500 रुपये इतकी होती. ही मदत प्रति दोन हेक्टर मर्यादे पर्यंत दिली जात असे. यामध्ये बदल करुन सरकारनं आता ही मदत 27 हजार रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टर च्या मर्यादे पर्यंत मिळणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आपल्या या निर्णयावरून सरकारनं घुमजाव केलं आहे.

वाचाआता शेतीला मिळणार दिवसा वीज, राज्य मंत्रीमंडळाचा ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

आता काय होणार

गेल्या काही महिन्यांत राज्यात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली होती. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसानं हजेरी लावली. त्यात फळबागा आणि अन्य शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं. मार्च आणि एप्रिल महिन्यात तर अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यात सुमारे 43 हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील 11 हजार 166 हेक्टरवर नुकसान झालं आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 हजार 956 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं होतं. या नुकसानीचे पंचनामे करुन देताना सामान्य निकषांनुसारच मागणी करावी अशा सूचना राज्य सरकारनं प्रशासनाला दिल्याची माहिती आहे. या सूचनेनुसारच प्रशासनानं अहवाल पाठवायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button