ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Corona New Variant | कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ; पुण्यात रुग्णसंख्या 150 वर, राज्यात 250

Corona New Variant | Corona's new variant JN.1; 150 patients in Pune, 250 in the state

Corona New Variant | राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1 च्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होतेय.(Corona New Variant) JN.1 च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे.

राज्यातील एकूण रुग्णसंख्या 250 वर पोहोचल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे यातील तब्बल 150 रुग्ण पुण्यातील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या 24 तासांत JN.1 च्या 59 रुग्णांची नोंद झाली आहे.

पुण्यासोबतच नागपूर 30, मुंबई 22, सोलापूर 9, सांगली 7, ठाणे 7, जळगाव 4, अहमदनगर 3, बीड 3, छत्रपती संभाजीनगर 2, कोल्हापूर 2, नांदेड 2, नाशिक 2, धाराशिव 2, अकोला 1, रत्नागिरी 1, सातारा 1, सिंधुदुर्ग 1 आणि यवतमाळ 1 अशी रुग्णसंख्या आहे.

वाचा : Immunity Booster Foods | हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून वाचण्यासाठी रोज नाश्त्यात खा ‘या’ 5 गोष्टी, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

गेल्या 24 तासांत 61 रूग्णांची नोंद

राज्यात मागील 24 तासांत कोरोनाच्या 61 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 70 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.17 टक्के असून, मृत्युदर 1.81 टक्के आहे. राज्यात मागील 24 तासांत 2 हजार 728 चाचण्या झाल्याच. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर 2.23 टक्के आहे.

राज्यातील आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

पुणे महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरोना चाचण्यांची संख्या जास्त आहे. याच वेळी जेनेटिक सिक्वेंसिंगणासाठी सर्वाधिक नमुने पुण्यातून पाठवले जातायत. राज्यात JN.1 चे पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. JN.1 हा कोरोनाचा सब-व्हेरिएंट फारसा धोकादायक नसून तो सौम्य
स्वरूपाचा आहे.

काय सावधगिरी घ्यावी?

  • नियमितपणे मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि हात स्वच्छ ठेवा.
  • लसीकरण पूर्ण करा.
  • वारंवार सर्दी, खोकला, ताप, थकवा, डोकेदुखी, घसा खवखवणे, अंगदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य सेवा घ्या.

सावधगिरी बाळगा, कोरोनाचा फैलाव रोखा!

Web Title | Corona New Variant | Corona’s new variant JN.1; 150 patients in Pune, 250 in the state

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button