ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Corona Virus | कोरोना पुन्हा धुमाकत! रुग्णसंख्या वाढली, नवीन व्हेरिएंटचा धोका? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञांचे मत!

Corona smoldering again! Increased number of patients, risk of new variants? Know the opinion of health experts!

Corona Virus | भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा डोकावत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, रविवारी देशात ३३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशात सक्रिय (Corona Virus) रुग्णांची संख्या आता १,७०१ वर पोहोचली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य तज्ज्ञ सतर्कतेचा इशारा देत आहेत.

नवीन रुग्णांसोबतच कोरोनाच्या मृत्यूच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. रविवारी पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, त्यापैकी चार मृत्यू केरळमध्ये झाले. केरळमध्येच कोरोनाचा नवीन सब-व्हेरिएंट JN.1 आढळून आल्याने चिंता वाढली आहे.

देशात आतापर्यंत ४ कोटी ५० लाख ४ हजार ८१६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४ कोटी ४६ लाख ६९ हजार ७९९ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, राष्ट्रीय बरे होण्याचा दर ९८.८१ टक्के आहे. भारतात कोविड-१९ मुळे आतापर्यंत ५,३३,३१६ लोकांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर १.१९ टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशात कोरोना लसीचे २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत.

केरळमध्ये नवीन सब-व्हेरिएंट JN.1 ची ओळख

भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या नियमित निरीक्षणाअंतर्गत केरळमधील ७९ वर्षीय महिलेमध्ये कोरोना सब-व्हेरिएंट JN.1 आढळला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) शनिवारी (१६ डिसेंबर) ही माहिती दिली. ICMR चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, ८ डिसेंबर रोजी दक्षिणेकडील राज्याच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथील आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह नमुन्यात हे प्रकरण आढळून आले.

वाचा : Dress Syndrome | वाचा! डोकेदुखी, मासिक पाळीच्या वेदनांसाठी घेत असलेल्या या औषधामुळे होऊ शकतो गंभीर आजार!

ते म्हणाले की, १८ नोव्हेंबर रोजी नमुना आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह आढळला होता. महिलेमध्ये इन्फ्लूएंझासारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, राज्यात आढळलेला कोरोना सब-व्हेरिएंट JN.1 हा चिंतेचा विषय नाही. नवीन व्हेरिएंटबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, काही महिन्यांपूर्वी सिंगापूर विमानतळावर चाचणीदरम्यान एका भारतीय प्रवाशामध्ये कोरोनाचा नवीन सब-व्हेरिएंट आढळून आला होता.

“हा सब-व्हेरिएंट आहे, तो नुकताच येथे आढळला आहे. त्यामुळे घाईची गरज नाही. परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : Corona smoldering again! Increased number of patients, risk of new variants? Know the opinion of health experts!

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button