ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Agricultural Advisory | राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 2 एप्रिल 2023 दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची अधिक
शक्यता वर्तविण्यात आली आहे. 31 मार्च व 1 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Agricultural Advisory) होण्याची अधिक शक्यता आहे. 2 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी अति हलक्या ते विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. चला तर मग हवामान आधारित पिक निहाय कृषी सल्ला (Agricultural Advisory) जाणून घेऊयात.

भुईमूग
भुईमूग पिकास गरजेनुसार ओलित करावे. शेतात पाणी साचून मूळकुज होऊ नये याची काळजी घ्यावी. आन्या सुटल्यानंतर आंतरमशागत करू नये. भुईमुग पिकाला आया तयार होण्याची अवस्था ते शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढते तापमान लक्षात घेता. जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या (Agricultural Advisory) आवश्यकतेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

हरभरा
पावसाचा अंदाज लक्षात घेता परिपक्क अवस्थेतील हरभरा पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची (Agricultural Advisory) सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

गहू
पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू पिकाची काढणी आणि मळणी ची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

संत्रा
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसार 7 ते 10 दिवसाच्या अंतराने दुहेरी पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच उपलब्ध असल्यास 1 ते 4 वर्ष वयाच्या झाडाला 12 ते 53 लिटर पाणी 5 ते 7 वर्ष वर्षावरील झाडांना 145 ते 180 लिटर प्रती झाड प्रती दिवस पाणी द्यावे. झाडांच्या आळ्यामध्ये आच्छादनांचा वाप टाळण्यासाठी 2-4- डी 1.5 ग्राम आणि 1 किलो युरिया 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तापमाना घेता 2-4 डी 1.5 ग्राम आणि पोटाशियम नायट्रेट 1 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Chance of rain with lightning in the state, know weather based agriculture advisory

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button