ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Light bill | काय सांगता? 25 वर्षांत 1 रुपयाही वीजबिल न आकारणारी सरकारने आणली ‘ही’ योजना

काय सांगता? 25 वर्षांत 1 रुपयाही वीजबिल न आकारणारी सरकारने आणली ‘ही' योजना वाढती महागाई (Inflation) आणि आर्थिक मंदीमुळे (Economic downturn) नागरिक त्रस्त झाले आहेत.

Light bill | महागाईची चणचण सरकरपासून (Government) सामान्य नागरिकांना सोसावीच लागते. त्यातच विजेचे बिल (Electricity bill) देखील नको तितके येते. यामुळे सामान्य नागरिकाचे आर्थिक बजेट (budget) ढासळते. यावरच उपाय म्हणून सरकारने नवीन स्कीम (scheme) आणली आहे. 2030 पर्यंत प्रत्येक घरात अपारंपरिक पद्धतीने वीजनिर्मिती (Power generation) केली जाणार आहे.

काय आहे ही वीजबिल वाचवणारी सरकारची योजना?
आजकाल प्रत्येक नागरीकांना विजेबिलाचे (light bill) आकडे ऐकून झटके बसत आहेत. यावरच उपाय म्हणून सरकारने सौरऊर्जा (Solar energy) हा उत्तम पर्याय काढला आहे. 2030 पर्यंत 40℅ वीज ही अपारंपरिक (Unconventional) पध्दतीने निर्माण करायचे उद्दिष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. यातून शिल्लक असलेल्या विजेची विक्री करणे आणि विजेची गरज भागवणे अशा दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा हेतू देखील साध्य होईल. याच गोष्टीमुळे सौर पॅनलची (Solar panel) यंत्रणा बसवण्यासाठी सरकार मदत करणार आहे.

वाचा:  Schemes For Farmers | शेतकऱ्यांना ‘या’ 5 योजनेंतर्गत मिळतंय आर्थिक साहाय्य, जाणून घ्या कोणत्या आहेत या योजना?

सौर पॅनलच्या मदतीने आपण किती वीज वापरू शकतो?
2030 पर्यंत 100 गिगा व्हॅट (Gigawatt) एवढ्या क्षमतेने विज उत्पादन करण्याचे सरकारचे नियोजन आहे. या यंत्रणेमुळे तुम्ही घरातील 1 एसी, 3-4 पंखे, 5-7 एलईडी बल्ब किंवा लाईट्स, फ्रिज, टीव्ही, इतर मशिनरी सहज वापरू शकता. एक घरासाठी 2-4 kw क्षमतेचे पॅनल पुरेसे ठरतात. प्रत्येक महिन्याला 4 हजाराच बिल वाचेल आणि याचा हिशोब केला तर 2.5 वर्षाच्या आत तुमचा खर्च सहज निघेल.

वाचा: PM Kisan | शेतकऱ्यांनो तात्काळ करा ‘ही’ 3 कामे, अन्यथा पीएम किसानच्या योजनेतून वगळले जाईल नाव…

सौर पॅनल बसवण्यासाठी येणारा खर्च
या सगळ्या गोष्टींसाठी एकूण खर्च 1 लाख 88 हजार एवढा येतो परंतु सरकार अनुदान (subsidy) देत असल्यामुळे त्याची किंमत 1लाख 26 हजारापर्यंत जाते. 2kw ची पॅनल बसवले तर खर्च 1 लाख 20 हजारापर्यंत याचा खर्च जातो. सरकार कडून सौर पॅनल बसवण्यासाठी सुमारे 48000 चे अनुदान मिळते. सरकारकडून मिळणाऱ्या या 40℅ पर्यंतच्या अनुदानामुळे तुमचा कमी खर्च कमी होतोच पण याबरोबरच तुमचे वीजबिल देखील वाचते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button