ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Schemes For Farmers | शेतकऱ्यांना ‘या’ 5 योजनेंतर्गत मिळतंय आर्थिक साहाय्य, जाणून घ्या कोणत्या आहेत या योजना?

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक विविध प्रकारच्या योजना (Yojana) राबवल्या जातात. शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तींमुळेही (Natural disaster) मोठे नुकसान होते.

Schemes For Farmers | शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव (Commodity fair price) देखील मिळत नाही. याचमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य (Financial assistance) देण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला होता. मात्र, अनेकदा शेतकरी (Farmer) या योजनांपासून वंचित राहतात. कारण त्यांना या योजनांबद्दल माहिती मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योजनांबद्दल सांगणार आहोत ज्या शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या आहेत.

PM Kisan Samman Nidhi Scheme | पीएम किसान सन्मान निधी योजना
पंतप्रधान मोंदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 3 हप्ते मिळतात. प्रत्येक हप्त्याला 2 हजार दिले जातात. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती व नुकसानीसाठी मदतीचा हात देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

वाचा: LPG Price Hike | सामान्यांना महगाईचा आणखी एक दणका! घरगुती गॅसमध्ये ‘इतकी’ वाढ, वाचा नवे दर

Rayathu Bandhu Yojana | रयथू बंधू योजना
या योजनेंतर्गत राज्य सरकार पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वार्षिक 10,000 रुपये आर्थिक सहाय्य पाठवते. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची जमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. ही योजना तेलंगणा सरकार चालवते.

PM Kisan Maandhan Yojana | पीएम किसान मानधन योजना
ही एक सरकारी योजना आहे. याद्वारे 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये मिळतात. मात्र, 18 ते 40 वर्षांतील व्यक्ती अर्ज करू शकतात. त्यासाठी 18 वर्षांपासून दर महिन्याला 55 रुपये प्रीमियम भरावा लागतो.

वाचा: Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! ‘या’ महिन्यापासून मोफत धान्य योजना बंद, जाणून घ्या कारण?

Tube well Scheme | कूपनलिका योजना
कूपनलिका या योजनेंतर्गत उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कूपनलिकासाठीअनुदान दिले जाते. ही योजना उत्तर प्रदेशातील सरकार चालवते.

Pradhan Mantri Kusum Yojana | प्रधानमंत्री कुसुम योजना
प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंपासाठी 60 टक्के अनुदान दिले जाते. त्यासह शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत 30 टक्के कर्ज देखील दिले जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button