ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

BFF Technology | खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बीएफएफ तंत्रज्ञान फायदेशीर, जाणून घ्या बीएफएफ पेरणी यंत्राचा फायदा

शेतकरी कोणत्याही हंगामात आपल्या शेतीत (Agriculture) जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी धडपड करत असतात.

BFF Technology | अलिकडच्या काळात शेतकरी सतत विविध तंत्रज्ञान (Technology) वापर करून शेती करतात. त्याचबरोबर कोणताही हंगाम तोंडावर येताच कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. जेणेकरून शेतकरी योग्य त्या वाटचालीस जाऊन शेतीत जास्तीत जास्त उत्पादन मिळवतील. आता खरीप हंगाम (Kharif season) तोंडावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची देखील शेतीची योग्य पद्धतीने मशागत व्हावी यासाठी लगबग सुरू होताना दिसून येत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले आहे. चला तर मग जाणून घेऊया कृषी विभागाने मशागती (Cultivated) बाबत शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केले आहे.

बीएफएफ तंत्रज्ञान
कृषी विभाग शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असतं. शेतीत योग्य प्रकारे यंत्र चालवणी कशी करावी कशा पद्धतीने सरी पाडावी याबद्दल सांगितले जाते. आता खरीप हंगासाठी शेतकऱ्यांनी बीएफएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची लागवड करावी. या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आंतरपीक पद्धतीने शेती करू शकतात. त्यामुळे एकाच शेतीत दोन पिके शेतकरी सहज घेऊ शकतात.

बीएफएफ पेरणी यंत्र कसे काम करते?
हे एक ट्रॅक्‍टरचलित यंत्र आहे. याला चार फणी यंत्राच्या सांगाड्यावर दोन सरी नांगर बसवलेले असतात. यंत्राच्या सांगाड्यावर एक पेटी बसविलेली आहे. ज्या पेटी मध्ये खत व बियाणासाठी दोन मुख्य भाग आहेत. या मुख्य भागाचे फणाच्या संख्येनुसार प्रत्येकी चार उपभाग केले आहेत. अशा प्रकारे यंत्राच्या प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बियाणे व खतपेटी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपिकाची पेरणी सहज करता येते.

वाचा: Bioflock Technology | आता तलावाशिवाय मत्स्यपालन करणे शक्य? ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर करून मिळवा लाखोंचं उत्पन्न

कसे आहे यंत्र?
बियाणे पेरणीसाठी तिरपी प्लेट तर खत पेरणीसाठी उभी प्लेट बसविण्यात येते. यंत्रासोबत विविध पिकांच्या पेरणीसाठी स्वतंत्र प्लेट दिलेल्या आहेत. यंत्रामध्ये आवश्‍यकतेप्रमाणे खताचे प्रमाण कमी जास्त करता येते. टोकण यंत्राने सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, ज्वारी, मूग, उडीद, कपाशी, बाजरी, कांदा या पिकांची पेरणी करता येते.

BBF Technology | काय आहे हे तंत्रज्ञान?
(बीबीएफ) पेरणी यंत्र हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र आहे. रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या 3 ते 4 ओळी 30 सें.मी. किंवा 45 सें.मी. अंतरावर 3 ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी 30 ते 45 सें.मी. गरजेनुसार ठेवता येते. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे 20 ते 27 % जलसंधारण, तर 25 % उत्पादनात वाढ दिसून आली आहे.

वाचा: Grafting Technology | काय सांगता? ‘या’ तंत्रज्ञानाद्वारे टोमॅटो आणि बटाटे येणारं एकाच झाडाला, जाणून घ्या हे तंत्रज्ञान

काय आहेत बीबीएफ पेरणीचे फायदे?
• या पेरणीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंबही करता येत असल्याने फायदेशीर ठरते.
• जलसंवर्धन: बीबीएफ पेरणी यंत्राच्या साहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते.
• बीबीएफ पद्धतीने खर्चात 20 ते 25 टक्के बचत होते‌व मजूरांची तशी तसेच ऊर्जेची 40 ते 60 बचत होते.
• खत व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होतो.
• उत्पादनामध्ये 25 ते 30 टक्के वाढ होते.
• वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत सुद्धा पाण्याचा ताण तीव्रता कमी होते.
• जास्त पर्जन्यमान झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.
• पिकास मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. पीक कीड रोगास बळी पडत नाही.
• या पद्धतीमुळे जमीन भुसभुशीत होते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button