ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Insurance | ब्रेकिंग! गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील लाभार्थी कुटुंबांना ’इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

Insurance | केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध योजना राबवल्या जातात. ज्यात पीक कर्ज, शेती संबंधित हजारांचे अनुदान यांचा समावेश असतो. परंतु शेतकऱ्यांचे शेतीमध्ये7 काम करताना अपघात झाल्यावर देखील शेतकरी अपघात विमा (Insurance) दिला जातो. शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते. ज्याद्वारे शेतकर्‍यांना अपघाती अपघाती विमा (Insurance) मिळतो. याबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

वाचाOnion | काय सांगता? ‘या’ तंत्रज्ञानाने शोधता येणार चाळीतला खराब कांदा, कसं ते जाणून घ्या सविस्तर

कोट्यवधींचा निधी मंजूर
आता शेतकरी अपघात विमा (Insurance) योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना 29.95 कोटी निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. आता लवकरच ही रक्कम लाभार्थी कुटुंबीयांच्या खात्यात बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामुळे आता लाभार्थी कुटुंबातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
तर 3 डिसेंबर 2021 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा (Insurance) योजना याअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज करुन दावे केले आहेत. त्या शेतकऱ्यांचे 90 टक्के दावे निकाली काढल्यानंतरच त्यावर्षीचे पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांना दिले जाणारे बजेट निश्चित करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळत नव्हता. त्याचवेळी या शासन निर्णयातून ही अट हटवण्यात आली आहे. त्यासह यातील घोषणापत्र अ देखील हटवण्यात आलं आहे.

वाचाBFF Technology | खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बीएफएफ तंत्रज्ञान फायदेशीर, जाणून घ्या बीएफएफ पेरणी यंत्राचा फायदा

किती मिळणार विमा?

  • अपघाती मृत्यू- नुकसान भर्पाइची रक्कम रु.2 लाख.
  • अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख
  • अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.

काय आहेत आवश्यक कागदपत्रे?

  • शेतकऱ्याच्या जमिनीचा 7/12 ( वहितीधारक नसेल तर कुटुंबातील सदस्याचा )
  • 6 क ची नकल
  • 6 ड (फेरफार)
  • एफ. आय. आर. (FIR COPY)
  • पंचनामा
  • पोष्ट मार्टेम रिपोर्ट
  • व्हिसेरा रिपोर्ट
  • दोषारोप
  • दावा अर्ज
  • वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
    घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह)
  • वयाचा दाखला
  • तालुका कृषि अधिकार पत्र
  • अकस्मात मृत्यूची खबर
  • घटनास्थळ पंचनामा
  • इंनक्वेस्ट पंचनामा
  • वाहन चालविण्याचा वैध परवाना
  • अपंगत्वाचा दाखला व फोटो
  • औषधोपचाराचे कागदपत्र
  • अपघात नोंदणी 45 दिवसाचे आत करणे

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Beneficiary families of Gopinath Munde accident insurance scheme sanctioned funds of crores

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button