ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

अर्रर्र..! महाडीबीटी पोर्टलमुळे तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना फटका; कोट्यवधींच्या अनुदानाला लागणार चुना

Yojana | शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मदत करता यावी यासाठी सरकार नेहमी धडपडत असत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना (Agriculture) या योजनांमार्फत शेती करण्यास प्रोत्साहित केले जाईल तसेच त्यांना आर्थिक (Financial) दिलासा देखील मिळेल. यापैकीच असणारे एक कृषी (Department of Agriculture) यांत्रिकीकरण अभियान राज्यात राबवले जाते. मात्र, या अभियानातील तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना वेबसाईटमुळे मोठा फटका बसत आहे.

वाचा: शेतकऱ्यांची चिंता वाढणार! रब्बी हंगामातही खतांची टंचाई; थेट दरावर होणार परिणाम, जाणून घ्या…

कृषी यांत्रिकीकरण योजना
राज्यामध्ये सर्वच्या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलवरून राबवल्या जातात. याच पोर्टलवर राबवली जाणारे कृषी यांत्रिकीकरण अभियान हे शेतकऱ्यांना (Agri News) प्रचंड फायदेशीर ठरते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर (Tractor Subsidy) आणि त्याच्या अवजारांसाठी अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

महाडीबीटी पोर्टल बंद
महाडीबीटीवर ‘एक शेतकरी योजना अनेक’ या अंतर्गत सर्व योजना (Yojana) राबवल्या जातात. हे पोर्टल सातत्याने बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना (Type of Farming) याचा फटका बसत आहे. कारण अनुदानासाठी निवडलेले शेतकरी बाद करण्यात येत आहेत.

वाचा: ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

50 लाख शेतकऱ्यांना फटका
ट्रॅक्टर, ड्रीप, स्प्रिंकलर, शेडनेट, ग्रीन हाऊस यासह विविध योजनांसाठी महाडीबीटी पाेर्टलवर 50 लाख अर्ज दाखल करण्यात आले आहे. ज्यात सर्वाधिक 15 लाख अर्ज ट्रॅक्टरसाठी करण्यात आले आहे. तसेच ड्रीपसाठी 15 लाख अर्ज आहेत. हॉर्टिकल्चरसाठी साडे आठ लाख शेतकरी, खते, बियाणे याच्या अनुदानित मागणीसाठी दहा लाख शेतकऱ्यांनी अर्ज केलेत. मात्र, पोर्टल सातत्याने बंद पडत असल्यामुळे जवळपास 50 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. यामुळेच या अंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकरी वाढीव मुदत मिळावी यासाठी मागणी करत आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Arrrr..! As many as 50 lakh farmers hit by MahaDBT portal; A subsidy of crores will be needed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button