ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agromet Advisory | रब्बी हंगाम सुरू होताच बिघडले वातावरण! पुढील 5 दिवसांसाठी जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला

Agromet Advisory | भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 3 ते 7 डिसेंबर 2022 दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ व हवामान (Weather Update) कोरडे राहण्याची अधिक शक्यता आहे. कमाल तापमान 29.0 ते 29.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11.9 ते 12.8 अंश सेल्सिअस राहण्याची आशिक शक्यता आहे. सकाळची (Financial) सापेक्ष आद्रता 67 ते 75 टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता 52 ते 60 टक्के राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी (Agriculture) आपल्या पिकाची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

वाचा: अर्रर्र..! महाडीबीटी पोर्टलमुळे तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना फटका; कोट्यवधींच्या अनुदानाला लागणार चुना

कृषि सल्ला
• ज्या भागात कापूस (Cotton Rate) पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. तेथे शेतकरी बांधवांनी
कपाशीच्या वेचनीच्या (Agri News) कामाला प्राधान्य द्यावे.
• वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावा.
• कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/
गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा.
• हंगामी पिके, फळबागा, भाजीपाला पिकामध्ये
आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इत्यादी.) कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची व
उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे सुरु ठेवावीत.
• गहू पिकास पेरणीनंतर 18 ते 20 दिवसानंतर मुकुटमुळे
फुटण्याच्या अवस्थेत पहिले पाणी द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास 33 टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ
शकते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

कापूस
कपाशीमधील पानांवरील तपकिरी ठिपके किंवा दहिया रोग व पानावरील बुरशीजन्य ठिपके रोगाच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सिस्ट्रोबिन18.2% डब्ल्यू /डब्ल्यू डायफेनोकोनाझोल11.4% डब्ल्यू/डब्ल्यूएससी 10 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथाइल44.3 एसस 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच सडलेली बोंडे व रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावी.

हरबरा
वाफसा अवस्थेत हरभरा (Gram) पिक 20 ते 30 दिवसाच्या अवस्थेत असताना पाणी व अन्नद्रव्यासाठी पिकाची तनासोबत स्पर्धा टाळण्यासाठी दोनवेळा खुरपणी
व कोळपणी करावी.

वाचा: ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

गहू
• गहू (Wheat) पिकास पेरणीनंतर 18 ते 20 दिवसानंतर मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत पहिले पाणी द्यावे.
• या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास 33 टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
• बागायती उशिरा गहू पेरणीसाठी प्रती हेक्टरी 150 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
• गहू पिकाच्या एचडी 2189 किंवा पूर्णा
• यासारख्या जाड दाण्यांच्या वाणांसाठी बियाणे दर प्रती हेक्टरी 125 किलो वापरावे.
• बागायती उशिरा पेरणीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा
द्यावी.
• बागायती वेळेवर आणि उशिरा या दोन्ही पेरणीसाठी नत्राची अर्धी मात्रा तसेच संपूर्ण स्फुरद आणि
पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेली नत्राची अर्धी मात्रा पहिल्या पाण्याचे पाळीच्या वेळी (18 ते 20 दिवसानंतर) द्यावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: As soon as the Rabi season started, the atmosphere worsened! Know weather based agriculture advisory for next 5 days

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button