ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Post Office | पोस्ट विभागाच्या ‘या’ योजनेत केवळ 299 रुपयांत मिळतोय 10 लाखांचा विमा, जाणून घ्या फायदे

Post Office | पोस्ट विभाग केवळ पोस्टाचीच सेवा पुरवते असे नाही. तर विविध योजना विमा पॉलिसी देखील नागरिकांना देते. पोस्ट विभागाने ‘फर्स्ट स्टेप ऑफ प्रोटेक्शन’ (The first step to safety) म्हणून अपघात विमा योजना (Accident insurance plan) सुरू केली आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा विमा उतरवला जातो. या योजनेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. महागड्या प्रीमियमवर विमा काढू शकत नसलेल्या लोकांसाठी, पोस्ट विभागाने ‘फर्स्ट स्टेप ऑफ प्रोटेक्शन’ नावाची विमा (Insurance) योजना आणली आहे. पोस्टमास्तर श्रावणकुमार यांच्यासह टीमच्या हस्ते केक कापून विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. चला तर मग या योजनेबद्दल जाणून घेऊयात.

पोस्ट विभाग विमा योजना
सुरक्षिततेची पहिली पायरी या विमा योजनेत लाभार्थ्यांचा 10 लाख रुपयांचा विमा केवळ 299 रुपये आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह एका वर्षात काढला जाईल. या विम्याचे एक वर्षाच्या शेवटी नूतनीकरण करावे लागेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते असणे अनिवार्य आहे.

कसा मिळेल लाभ?
299 रुपयांच्या विम्यामध्ये अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व यावर 10 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाईल. यासोबतच 299 रुपयांच्या या विम्यामध्ये अपघात उपचारासाठी 60000 रुपयांपर्यंतचा IPD आणि OPD मध्ये 30000 रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे. अपघात विमा सुरू झाल्याची माहिती पोस्टमास्तरांनी दिली. कोणताही लाभार्थी पोस्ट ऑफिसमध्ये येऊन योजनेची माहिती घेऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button